Tuesday, April 14, 2026
spot_imgspot_imgspot_img
₹0.00

No products in the cart.

Homeरोजच्या घडामोडीशेतकऱ्यांसाठी ऑनलाईन डिजिटल शेती शाळा सुरू; पाहा सविस्तर वेळापत्रक

शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन डिजिटल शेती शाळा सुरू; पाहा सविस्तर वेळापत्रक

शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन डिजिटल शेती : शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळावी आणि उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवता यावे, यासाठी एप्रिल महिन्यात चार विशेष डिजिटल शेतीशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे आयोजन नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. शेतकरी, महिला बचत गट तसेच शेतकरी गटांनी या शेतीशाळांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतीशाळांचे वेळापत्रक आणि विषय

एप्रिल महिन्यातील शेतीशाळांमध्ये विविध महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे :

  • ५ एप्रिल : पेरणीपूर्व तयारी, बेड तयार करणे, योग्य पद्धतीने बियाणे पेरणी, आंतरपीक पद्धती आणि बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी
  • ८ एप्रिल : सेंद्रिय शेतीत वापरली जाणारी जैविक निविष्ठा – बीजामृत, जीवामृत, लिंबोळी अर्क, दशपर्णी अर्क आणि ट्रायकोडर्मा तयार करण्याच्या पद्धती
  • १५ एप्रिल : एकात्मिक कीड व्यवस्थापन – सापळा पिके, चिकट सापळे, पक्षी थांबे आणि जैविक उपायांचा वापर
  • २२ एप्रिल : भात शेतीतील सुधारित तंत्र – डीएसआर (थेट पेरणी), श्री पद्धत आणि यांत्रिक लागवड

शेतीशाळेचे वेळ आणि प्रसारण

या सर्व शेतीशाळा संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होतील. या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, पाणी फाउंडेशन तसेच उमेदच्या यूट्यूब चॅनलवर करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन डिजिटल शेती

उपक्रमामागील उद्देश

हवामान बदलामुळे शेतीसमोरील आव्हाने वाढत आहेत. पावसातील अनिश्चितता, नैसर्गिक आपत्ती आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर “हवामान अनुकूल तंत्रज्ञान” या संकल्पनेअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

डिजिटल शेतीशाळा शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान शिकवून कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्यास मदत करते. बदलत्या हवामानात शेती टिकवण्यासाठी हा उपक्रम खूप उपयुक्त आहे.या उपक्रमात कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, तज्ञ अधिकारी आणि प्रगतशील शेतकरी यांचा सहभाग आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून शेतकऱ्यांना आधुनिक व उपयोगी माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध होणार आहे.

हे ही वाचा : रॉकेल वाटप GR जाहीर : कोण पात्र, किती लिटर मिळणार? वाचा सविस्तर

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments