Thursday, April 9, 2026
spot_imgspot_imgspot_img
₹0.00

No products in the cart.

Homeयोजनामुख्यमंत्री शाश्वत कृषीसिंचन योजना:शेततळे व प्लास्टिक अस्तरीकरणासाठी मिळणार अनुदान

मुख्यमंत्री शाश्वत कृषीसिंचन योजना:शेततळे व प्लास्टिक अस्तरीकरणासाठी मिळणार अनुदान

मुख्यमंत्री शाश्वत कृषीसिंचन योजना : राज्यातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारकडून मुख्यमंत्री शाश्वत कृषीसिंचन योजना अधिक प्रभावीपणे राबवली जात आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 2025-26 या वर्षासाठी तब्बल 500 कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या निधीतून सूक्ष्म सिंचनासाठी 400 कोटी रुपये तर वैयक्तिक शेततळ्यांसाठी 100 कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत. यामुळे पाणी व्यवस्थापन सुधारण्यास आणि शेती उत्पादन वाढवण्यास मदत होणार आहे.

सूक्ष्म सिंचन आणि शेततळ्यांना प्राधान्य

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत ड्रिप आणि स्प्रिंकलर सारख्या सूक्ष्म सिंचन पद्धतींना प्रोत्साहन दिले जाते. यामुळे कमी पाण्यात जास्त उत्पादन घेणे शक्य होते. तसेच वैयक्तिक शेततळे तयार करून पावसाचे पाणी साठवण्याची सुविधा मिळते, ज्यामुळे दुष्काळी परिस्थितीतही शेती टिकून राहते.

या योजनेअंतर्गत अर्ज महाडीबीटी पोर्टलद्वारे स्वीकारले जातात. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर अर्जांची निवड केली जाते.

लाभार्थी निवड प्रक्रिया

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. शेतकरी स्वतः मोबाईल किंवा संगणकावरून अर्ज करू शकतात किंवा जवळच्या CSC सेंटरवरूनही अर्ज करता येतो.अर्ज करताना शेततळे इनलेट-आउटलेटसह किंवा इनलेट-आउटलेटशिवाय कोणते घ्यायचे आहे, हा पर्याय निवडावा लागतो. अर्ज पूर्ण भरल्यानंतर तो महाडीबीटी पोर्टलवर सबमिट केला जातो.

    त्यानंतर आलेल्या सर्व अर्जांमधून संगणकीय पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाते. ज्यांची निवड होते त्यांना पुढील प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात.

मुख्यमंत्री शाश्वत कृषीसिंचन योजना

प्लास्टिक अस्तरीकरणासाठी अनुदान

शेततळे तयार केल्यानंतर त्यामध्ये साठवलेले पाणी जमिनीत मुरू नये म्हणून प्लास्टिक अस्तर (lining) लावले जाते. यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. या कामासाठी एकूण खर्चाच्या 50% पर्यंत किंवा जास्तीत जास्त 75,000 रुपये इतके अनुदान मिळू शकते.

हे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर पुन्हा ऑनलाइन अर्ज करावा लागतो. अर्ज करताना आधार क्रमांकाची पडताळणी (verification) करणेही आवश्यक असते.

हे ही वाचा : पीएम किसान 22वा हप्ता कधी येणार? तारीख ठरली, या दिवशी खात्यात जमा होणार पैसे

BALWAAN Krishi Battery Sprayer 12 Volts x 8 Ampere | High Pressure up to 15 Feet Spray | 18 Litre Tank Capacity | BS-20 – खरेदी करा

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments