Tuesday, April 14, 2026
spot_imgspot_imgspot_img
₹0.00

No products in the cart.

HomeइतरAadhunik sheti tantraखासगी दस्त नोंदणी केंद्रांना मंजुरी ; नागरिकांना किती पैसे मोजावे लागणार?

खासगी दस्त नोंदणी केंद्रांना मंजुरी ; नागरिकांना किती पैसे मोजावे लागणार?

खासगी दस्त नोंदणी केंद्र : राज्यातील दस्त नोंदणी प्रक्रियेत होणारी गर्दी, वेळेचा अपव्यय आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता सरकारी कार्यालयांबरोबरच खासगी दस्त नोंदणी केंद्रे सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे नोंदणी प्रक्रिया अधिक वेगवान होण्याची अपेक्षा आहे.

सेवा कशी सुरू होणार

सरकार ही नवीन सेवा एकदम सगळीकडे सुरू करणार नाही. ती हळूहळू टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे.

🔹 पहिला टप्पा

  •     सुरुवात मोठ्या शहरांपासून होईल
  • मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूर येथे काहीच (मर्यादित) कार्यालये सुरू केली जातील

🔹 दुसरा टप्पा

  • पहिला टप्पा नीट चालला तर पुढे विस्तार केला जाईल
  •  मोठ्या शहरांमध्ये आणखी केंद्रे वाढवली जातील
  • नाशिक, संभाजीनगर अशा शहरांमध्येही सेवा सुरू होईल

🔹 तिसरा टप्पा

  • शेवटी ही सेवा पूर्ण राज्यात पोहोचेल
  • बाकी जिल्ह्यांमध्येही कार्यालये सुरू होतील
  • ग्रामीण भागातही ही सुविधा मिळेल

खासगी कार्यालये, पण नियंत्रण सरकारचे

खासगी दस्त नोंदणी कार्यालये सुरू केली जाणार असली तरी त्यावर पूर्णपणे सरकारचे नियंत्रण राहणार आहे. ही केंद्रे खासगी कंपन्यांकडून चालवली जातील, पण प्रत्येक ठिकाणी सरकारी अधिकारी उपस्थित असतील. दस्तांची तपासणी आणि संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया ही सरकारी देखरेखीखालीच होणार आहे. त्यामुळे काम जलद होईल, पण पारदर्शकता आणि नियमांचे पालनही कायम राहील, तसेच गैरव्यवहार होण्याची शक्यता कमी होईल.

हा निर्णय का घेण्यात आला?

हा निर्णय का घेतला गेला, तर सध्या उपनिबंधक कार्यालयांमध्ये खूपच गर्दी होत आहे. लोकांना तासन्‌तास रांगेत उभं राहावं लागतं, कधी तांत्रिक प्रॉब्लेम्स येतात आणि त्यामुळे काम आणखी उशिरा होतं. यामुळे नागरिकांचा खूप वेळ वाया जातो. म्हणूनच लोकांना लवकर आणि सोप्या पद्धतीने सेवा मिळावी, त्यांचा वेळ वाचावा आणि त्रास कमी व्हावा म्हणून सरकारने खासगी नोंदणी केंद्रांचा पर्याय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

खासगी दस्त नोंदणी

नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा

खासगी नोंदणी केंद्रांमध्ये नागरिकांसाठी काही अतिरिक्त सुविधा दिल्या जाणार आहेत:

  • वातानुकूलित (AC) वातावरण
  • आरामदायी बसण्याची व्यवस्था
  • स्वच्छता आणि स्वच्छतागृह सुविधा
  • प्रतीक्षा वेळ वाढल्यास चहा/कॉफीची सोय
  • कमी वेळेत नोंदणी प्रक्रिया पूर्ण

या सेवेसाठी प्रति दस्त सुमारे ₹5,000 पेक्षा जास्त अतिरिक्त शुल्क भरावे लागेल, जे खासगी कंपनीकडे जाईल. मात्र स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शुल्क हे पूर्वीप्रमाणेच सरकारकडेच जमा होईल.

हे ही वाचा : माजी सैनिक,भूमिहीन शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! वर्ग-2 जमीन होणार वर्ग-1, वाचा सविस्तर

BALWAAN Krishi Battery Sprayer BS-20 (12V x 8Ah) – 18 लिटर टँक क्षमता, 15 फूटपर्यंत हाय प्रेशर स्प्रे; शेतीसाठी उत्तम पर्याय. आत्ताच खरेदी करा!

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments