Saturday, February 21, 2026
spot_imgspot_imgspot_img
₹0.00

No products in the cart.

Homeयोजनासुकन्या समृद्धी योजना : नियम, व्याजदर आणि २१ वर्षांत ७० लाखांपर्यंत करमुक्त...

सुकन्या समृद्धी योजना : नियम, व्याजदर आणि २१ वर्षांत ७० लाखांपर्यंत करमुक्त लाभ

सुकन्या समृद्धी योजना:महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं आणि समाजात सन्मानाचं स्थान मिळावं यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून अनेक योजना राबवत असत . या योजनांमुळे महिलांना शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि बचतीच्या संधी उपलब्ध होतात . त्यांचं आयुष्य अधिक सुरक्षित आणि सशक्त बनत. सरकारचा उद्देश महिलांना मदतीवर अवलंबून न ठेवता आत्मविश्वासाने पुढे जाण्याची ताकद देण्याचा आहे. या पैकीच एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना (SSY) ही मुलींच्या भविष्यासाठी सरकारने सुरू केलेली सुरक्षित बचत योजना आहे.

या योजनेमुळे तिच्या शिक्षणासाठी आणि पुढील आयुष्यासाठी आर्थिक आधार तयार होतो. या योजनेत दरवर्षी किमान २५० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. या योजनेत पैसे टाकले तर त्यावर कराचाही फायदा मिळतो. म्हणजे तुम्ही भरलेले पैसे 80C अंतर्गत करातून वजा होतात. सरकार या योजनेवर चांगला व्याजदर देते, जो सध्या साधारण ८ टक्क्यांच्या आसपास आहे.

सुकन्या समृद्धी योजना 2026 – पात्रता व खाते उघडण्याचे नियम

  • सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारची मुलींसाठीची दीर्घकालीन बचत योजना आहे.
  • मुलीचे वय १० वर्षांखालील असणे खाते उघडण्यासाठी आवश्यक आहे.
  • ही योजना केवळ भारतातील रहिवासी मुलींसाठीच लागू आहे.
  • खाते मुलीच्या नावाने उघडले जाते, परंतु ते पालक किंवा कायदेशीर पालक चालवू शकतात.
  • एका मुलीसाठी फक्त एकच SSY खाते उघडता येते.
  • एका कुटुंबात जास्तीत जास्त दोन सुकन्या समृद्धी खाती उघडण्याची परवानगी आहे.
  • पहिल्या किंवा दुसऱ्या प्रसूतीत जुळी किंवा तिहेरी मुली झाल्यास दोनपेक्षा जास्त खाती उघडण्याची मुभा दिली जाते.
  • मात्र, पहिल्याच प्रसूतीत दोनपेक्षा जास्त मुली असतील, तर त्यानंतर जन्माला येणाऱ्या मुलींसाठी नवीन खाते उघडता येत नाही.

नियम

  • या योजनेत दरवर्षी किमान २५० रुपये जमा करणे बंधनकारक आहे.
  • एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त १.५ लाख रुपये गुंतवता येतात.
  • खाते उघडल्याच्या तारखेपासून एकूण २१ वर्षे खात्याची मुदत असते.
  • पैसे भरण्यासाठी रोख, चेक, डीडी किंवा ऑनलाइन ट्रान्सफरचे पर्याय उपलब्ध आहेत.
  • मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत खाते पालक किंवा कायदेशीर पालक चालवू शकतात.
  • खाते उघडल्यापासून ते परिपक्वता येईपर्यंत संबंधित भारतीय मुलगीच लाभार्थी असते.
  • मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला स्वतः खाते चालवण्याचा अधिकार मिळतो.

सुकन्या समृद्धी योजना

 सुकन्या समृद्धी योजना व्याजदर 2026

  • जानेवारी ते मार्च 2026 (Q4 – आर्थिक वर्ष 2025-26) साठी वार्षिक ८.२% व्याजदर लागू आहे.
  • हा व्याजदर इतर अनेक बचत योजनांपेक्षा जास्त असल्याने SSY ही आकर्षक गुंतवणूक मानली जाते.
  • व्याजाची गणना दर महिन्याच्या किमान शिल्लक रकमेवर केली जाते.
  • जमा झालेले व्याज आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यात जोडले जाते.

६५–७० लाख रुपयांपर्यंतची करमुक्त रक्कम

सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी किमान २५० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपये गुंतवता येतात.
खाते २१ वर्षांचे असून १५ वर्षे गुंतवणूक करावी लागते आणि सुमारे ८% पेक्षा जास्त व्याज मिळते.
नियमित गुंतवणुकीमुळे परिपक्वतेवेळी अंदाजे ६५–७० लाख रुपयांपर्यंतची रक्कम करमुक्त मिळू शकते.

हे ही वाचा : अतिवृष्टी नुकसान भरपाई : शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा, वाचा सविस्तर

खरेदी करा : Balwaan Krishi Battery Sprayer Gold Series (12V, 12A, Double Motor) हा 20 लिटर टँकसह येणारा शक्तिशाली स्प्रेयर

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments