Monday, April 13, 2026
spot_imgspot_imgspot_img
₹0.00

No products in the cart.

Homeयोजनापीएम किसान 22वा हप्ता कधी येणार? तारीख ठरली, या दिवशी खात्यात जमा...

पीएम किसान 22वा हप्ता कधी येणार? तारीख ठरली, या दिवशी खात्यात जमा होणार पैसे

पीएम किसान 22वा हप्ता : देशातील अनेक शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सरकारकडून लवकरच पीएम किसान २२वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकार च जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशभरातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

या संदर्भात ‘पीएम किसान’च्या अधिकृत X (ट्विटर) हँडलवरून माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी या योजनेचा २१ वा हप्ता १९ नोव्हेंबर २०२५ रोजी शेतकऱ्यांना देण्यात आला होता. माहितीनुसार, पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता १३ मार्चच्या आसपास वितरित होण्याची शक्यता आहे. हा हप्ता जमा झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट २ हजार रुपये जमा होतील.

पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम एकाच वेळी न देता तीन समान हप्त्यांमध्ये म्हणजेच प्रत्येकी २,००० रुपये अशा स्वरूपात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.

हप्ता मिळण्यासाठी ही कामे पूर्ण असणे आवश्यक

पीएम किसान योजनेचा लाभ मिळण्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण असणे आवश्यक आहे.

  • ई-KYC पूर्ण केलेले असणे
  • आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे
  • बँक खाते सक्रिय असणे
  • जमिनीची माहिती योग्यरित्या नोंदवलेली असणे

जर ही माहिती अपूर्ण असेल तर काही शेतकऱ्यांना हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकते.

तुम्ही लाभार्थी आहात का? यादीत नाव असे तपासा

तुमच्या खात्यात पीएम किसान योजनेचे पैसे येणार आहेत की नाही, हे जाणून घेण्यासाठी खालील प्रक्रिया करा:

  1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या: सर्वप्रथम gov.in या अधिकृत पोर्टलवर जा.
  2. Beneficiary List निवडा: होमपेजवर दिलेल्या ‘Beneficiary List’ या पर्यायावर क्लिक करा.
  3. माहिती भरा: त्यानंतर तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा (तालुका/ब्लॉक) आणि गाव निवडा.
  4. Get Report वर क्लिक करा: ‘Get Report’ या बटणावर क्लिक केल्यानंतर तुमच्या गावातील लाभार्थ्यांची यादी दिसेल. त्या यादीत तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

पीएम किसान 22वा हप्त्या

 पीएम किसान 22वा हप्त्या ची स्थिती कशी तपासाल?

पीएम किसान योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला आहे का हे पाहण्यासाठी pmkisan.gov.in या वेबसाइटवर जा. तिथे “Know Your Status” या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर नोंदणी क्रमांक आणि कॅप्चा टाका. मोबाईलवर आलेला OTP टाकल्यानंतर तुम्हाला हप्त्याची पूर्ण माहिती दिसेल.

मागील हप्त्यावेळी काही लाभार्थ्यांची नावे यादीतून काढण्यात आली होती, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली स्थिती वेळोवेळी ऑनलाइन तपासणे फायदेशीर ठरते.

 पंतप्रधान मोदींकडून हप्ता वितरण

१३ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाम दौऱ्यावर असताना पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता देशातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.ही रक्कम डिजिटल पद्धतीने थेट बँक खात्यात पाठवली जाईल.म्हणून शेतकऱ्यांना कुठेही जाण्याची गरज पडणार नाही.

हे ही वाचा : गॅस सबसिडीसाठी केवायसी अनिवार्य – 31 मार्चपर्यंत घरबसल्या करा केवायसी

शेतीसाठी मजबूत आणि प्रभावी असा हा स्प्रेयर आजच Balwaan Krishi Battery Sprayer Gold Series खरेदी करा.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments