Tuesday, April 14, 2026
spot_imgspot_imgspot_img
₹0.00

No products in the cart.

Homeरोजच्या घडामोडीगॅस सबसिडीसाठी केवायसी अनिवार्य – 31 मार्चपर्यंत घरबसल्या करा केवायसी

गॅस सबसिडीसाठी केवायसी अनिवार्य – 31 मार्चपर्यंत घरबसल्या करा केवायसी

गॅस सबसिडीसाठी केवायसी : प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत महिलांना स्वयंपाकासाठी गॅस कनेक्शन देण्यात येते आणि १४.२ किलोच्या एका सिलिंडरवर सुमारे ३०० रुपयांपर्यंत सबसिडी दिली जाते (वर्षाला ठराविक म्हणजे साधारण नऊ सिलिंडरपर्यंत). मात्र ही सबसिडी पुढेही मिळत राहण्यासाठी आता लाभार्थी महिलांनी आपली केवायसी अपडेट करणे बंधनकारक झाले आहे. वेळेत केवायसी पूर्ण केली नाही, तर गॅस सिलिंडरवर मिळणारी ही आर्थिक मदत बंद होऊ शकते, त्यामुळे सर्व लाभार्थींनी ही प्रक्रिया लवकर पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

खात्याची माहिती अपडेट नसल्यामुळे सबसिडी अडकते. त्यामुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत केवायसी अपडेट केली नाही, तर उज्ज्वला गॅस सबसिडी मिळणार नाही.

घरबसल्या केवायसी कशी करायची?

आपण अगदी सोप्या पद्धतीने मोबाईलवरून केवायसी करू शकता.

पद्धत – १ : मोबाईल अ‍ॅपद्वारे

  • आपण वापरत असलेल्या गॅस कंपनीचे अधिकृत मोबाईल अ‍ॅप डाउनलोड करा.
  • लॉगिन करून “KYC Update” किंवा “Profile Update” या पर्यायावर जा.
  • आवश्यक माहिती व कागदपत्रे अपलोड करा.
  • सबमिट केल्यानंतर केवायसी प्रक्रिया पूर्ण होते.

पद्धत – २ : अधिकृत वेबसाईटवरून

  • संबंधित गॅस कंपनीच्या वेबसाईटवर लॉगिन करून केवायसी अपडेट करता येते.

गॅस सबसिडीसाठी केवायसी अनिवार्य

ऑफलाईन पद्धतीने केवायसी कशी करायची?

  • आपल्या जवळच्या गॅस वितरक (डिस्ट्रिब्युटर) कार्यालयात भेट द्या.
  • आधार कार्ड, ओळखपत्र व कनेक्शन तपशील सोबत ठेवा.
  • तेथेच तुमची केवायसी पूर्ण करून दिली जाईल.

हे ही वाचा : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी : महाराष्ट्रात 1 लाख नवीन सौर पंपांना मंजुरी

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments