Friday, February 20, 2026
spot_imgspot_imgspot_img
₹0.00

No products in the cart.

Homeयोजनाशेतकऱ्यांसाठी मोठी बातमी : महाराष्ट्रात 1 लाख नवीन सौर पंपांना मंजुरी

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी : महाराष्ट्रात 1 लाख नवीन सौर पंपांना मंजुरी

पीएम कुसुम योजना : राज्यातील शेतकर्‍यांसाठी दिलसदायक बातमी आहे . पीएम कुसुम योजनेअंतर्गत महाराष्ट्राला लवकरच आणखी एक लाख सौर कृषी पंप मंजूर होणार असून ,त्यामुळे वीजेवरचा खर्च कमी होऊन शेतीसाठी स्वयपूर्ण ऊर्जा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे . नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकास आणि पर्यावरण संरक्षण यांचा समतोल राखणारी धोरणे स्वीकारली आहेत .

गेल्या काही वर्षांत भारताने सौर, पवन आणि जैवऊर्जा क्षेत्रात वेगाने प्रगती केली आहे. स्वच्छ ऊर्जेचा विस्तार हा केवळ पर्यावरण रक्षणापुरता मर्यादित न राहता रोजगारनिर्मिती, ऊर्जा सुरक्षितता आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारा ठरत आहे. हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रभावी पावले उचलणाऱ्या देशांमध्ये भारताचा उल्लेख जागतिक स्तरावर अग्रक्रमाने केला जात आहे.

मुंबईत ‘मुंबई क्लायमेट वीक’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले असून, यावेळी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, मुंबईच्या महापौर रितू तावडे तसेच प्रोजेक्ट मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी उपस्थित होते.

अक्षय ऊर्जेत महाराष्ट्राचा पुढाकार

या राष्ट्रीय परिवर्तनात महाराष्ट्र राज्याची भूमिका महत्त्वाची मानली जाते. राज्यात हरित ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी दीर्घकालीन धोरण राबवले जात असून, स्वच्छ हायड्रोजन, इलेक्ट्रिक वाहतूक, जैवइंधन तसेच शाश्वत पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात आहे. पुढील काही वर्षांत राज्यातील एकूण ऊर्जेमध्ये स्वच्छ ऊर्जेचा वाटा लक्षणीयरीत्या वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

पीएम कुसुम योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणखी १ लाख सौर कृषी पंप मंजूर होणार असून, त्यामुळे वीज खर्च कमी होऊन शेतीसाठी स्वयंपूर्ण व शाश्वत ऊर्जेला चालना मिळणार आहे.

पीएम कुसुम योजना

कुसुम योजनेचे फायदे

  • शेतकऱ्यांना कमी खर्चात सौर पंप व सौर यंत्रणा बसवण्याची सुविधा मिळते.
  • सिंचनासाठी वीज सहज उपलब्ध होते आणि वीज बिलाचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो.
  • सौर पंपामुळे शेतीचे काम वेळेवर पूर्ण होऊन उत्पादन वाढण्यास मदत होते.
  • सौर प्रकल्पातून तयार होणारी अतिरिक्त वीज विकून पूरक उत्पन्न मिळू शकते.
  • पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर वाढल्यामुळे प्रदूषण कमी होते.
  • ग्रामीण भागात शाश्वत आणि दीर्घकालीन ऊर्जेचा स्रोत उपलब्ध होतो.

हे ही वाचा : सुकन्या समृद्धी योजना : नियम, व्याजदर आणि २१ वर्षांत ७० लाखांपर्यंत करमुक्त लाभ

खरेदी करा : बलवान कृषी बॅटरी स्प्रेयर – गोल्ड सिरीज (BS-30G)
12 व्होल्ट 12 अँपिअर क्षमतेची बॅटरी, डबल मोटर, डिजिटल बॅटरी इंडिकेटर आणि 20 लिटर टाकीसह

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments