Thursday, June 4, 2026
spot_imgspot_imgspot_img
₹0.00

No products in the cart.

Homeरोजच्या घडामोडीजल जीवन मिशन ला वेग; संभाजीनगरात ७०२ पाणीपुरवठा योजना पूर्ण

जल जीवन मिशन ला वेग; संभाजीनगरात ७०२ पाणीपुरवठा योजना पूर्ण

जल जीवन मिशन योजना : जल जीवन मिशन योजना १५ ऑगस्ट २०१९ रोजी सुरू करण्यात आली आहे. या योजनेच मुख्य उद्दिष्ट्ये सर्व ग्रामीण भागातील घरांना पाण्याच्या नळ कनेक्शन द्वारे शुद्ध आणि पुरेशा प्रमाणात पाणी पुरवण्याचे आहे

ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशनअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. जिल्ह्यातील ,२४४ गावांसाठी एकूण १,१६४ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या असून त्यापैकी ७०२ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत.

३२३.५० कोटींचा खर्च, आणखी ४२०.३१ कोटींची गरज

आतापर्यंत या योजनांवर ३२३ कोटी ५० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र उर्वरित योजना पूर्ण करण्यासाठी ४२० कोटी ३९ लाख रुपयांच्या अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ८६० पाणीपुरवठा योजनांसाठी वाढलेले खर्च आणि तांत्रिक बदल लक्षात घेऊन सुधारित प्रशासकीय मंजुरीचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत या योजनांचा आढावा घेण्यात आला. गंगापूर, पैठण आणि वैजापूर तालुक्यांमध्ये कामांची प्रगती समाधानकारक असल्याचे सांगण्यात आले. तर उर्वरित काही तालुक्यांमध्ये प्रलंबित कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

७५ ते ९९ टक्के पूर्ण झालेल्या योजनांवर विशेष भर

जिल्ह्यात अनेक योजना ७५ ते ९९ टक्के पूर्णत्वाच्या टप्प्यावर आहेत. अशा योजनांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. तसेच शाळा, अंगणवाडी आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये नळजोडणीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले.

जल जीवन मिशन योजना

कामे पूर्ण झाल्यानंतर संबंधित योजना ग्रामपंचायतींकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. ज्या गावांमध्ये हस्तांतरण प्रक्रियेत अडचणी येत आहेत, तेथे विशेष ग्रामसभांचे आयोजन करून प्रश्न सोडविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

निष्कर्ष

जलजीवन मिशनमुळे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम होत आहे. जिल्ह्यातील १,१६४ योजनांपैकी ७०२ योजना पूर्ण झाल्या असल्या तरी उर्वरित योजना वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी, तांत्रिक मंजुरी आणि प्रशासन-कंत्राटदार यांच्यातील प्रभावी समन्वय महत्त्वाचा ठरणार आहे.

हे ही वाचा : GI Food : भौगोलिक निर्देशांक, आजरा घनसाळ तांदळाचे वैशिष्ट्य

आधुनिक शेती तंत्र पुस्तक खरेदी करा! नवीन व आधुनिक शेती तंत्रज्ञान, विविध पिकांची लागवड, खत व पाणी व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण, ड्रिप सिंचन, मल्चिंग, हायब्रिड वाणांची निवड आणि उत्पादन वाढीसाठी उपयुक्त तंत्रांची संपूर्ण माहिती या पुस्तकात उपलब्ध आहे. प्रत्येक शेतकऱ्यासाठी मार्गदर्शक ठरणारे हे पुस्तक आजच मिळवा.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments