Shubhanshu Shukla Axiom-4 Mission: भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी आज, २५ जून, अॅक्सियम मिशन ४ अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे यशस्वीरित्या प्रस्थान केले. त्यांच्या सोबत इतर तीन अनुभवी अंतराळवीर देखील या मोहिमेत सहभागी आहेत. शुभांशू शुक्ला हे या मिशनचे मुख्य पायलट आहेत.
भारतीय वेळेनुसार दुपारी १२ वाजता, फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून या मोहिमेची लाँचिंग पार पडली. सर्व अंतराळवीरांनी स्पेसएक्सच्या फाल्कन-9 रॉकेटशी संलग्न ड्रॅगन कॅप्सूल मधून उड्डाण केले. हे ड्रॅगन यान सुमारे २८.५ तासांच्या प्रवासानंतर, म्हणजे २६ जून रोजी दुपारी ४.३० वाजता, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाशी (ISS) जोडले जाणार आहे.
या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे – अंतराळात वैज्ञानिक संशोधन करणे, नवीन तंत्रज्ञानाची चाचणी घेणे आणि खाजगी अंतराळ प्रवासाला चालना देणे. अॅक्स-४ हे मिशन भविष्यातील व्यावसायिक अंतराळ स्थानक अर्थात अॅक्सियम स्टेशन तयार करण्याच्या विस्तृत योजनेतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे

भारत-नासा-इस्रो यांच्यात ऐतिहासिक करार
नासा आणि इस्रो यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानंतर, भारताला अॅक्सियम-४ मोहिमेत भाग घेण्याची संधी मिळाली. शुंभाशू शुक्ला हे या मोहिमेचे पायलट असून त्यांनी इतर तीन आंतरराष्ट्रीय अंतराळवीरांसोबत स्पेसएक्सच्या फाल्कन-9 रॉकेटद्वारे फ्लोरिडा येथील Kennedy Space Center वरून उड्डाण केले.
मोहिमेचे वैशिष्ट्य:
· मोहिमेचा कालावधी: १४ दिवस
· खर्च: ₹५४८ कोटी
· अंतराळात ७ वेगवेगळ्या वैज्ञानिक प्रयोग
· संशोधनासाठी भारतातील विविध संस्थांचा सहभाग
अंतराळातील प्रयोग: मूग, मेथी आणि जीवनशैलीवर परिणाम
या मोहिमेचे केंद्रबिंदू आहेत:
मूग आणि मेथीवर प्रयोग
· सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात अंकुरण प्रक्रियेचे निरीक्षण
· अन्ननिर्मितीतील क्षमतांचा अभ्यास
· पिकांची पौष्टिकता आणि औषधी गुणधर्मांचा प्रभाव
जैविक अभ्यास
· टार्डिग्रेड, सूक्ष्मजीव, मायक्रोअल्गी यांच्यावर प्रयोग
· अंतराळातील आरोग्य व स्नायूंच्या पुनर्रचनेचा अभ्यास
· मायोमस्क्युलर रिसर्च — अंतराळात शरीरावर होणारा परिणाम
अंतराळ शेतीचं भविष्य : एक नवा अध्याय
भारताच्या कृषी विज्ञान विद्यापीठ (केरळ व धारवाड), आणि आयआयटी धारवाड यांच्याशी मिळून बियाण्यांच्या गुणधर्मावर आधारित प्रयोग केले जातील. यामध्ये विविध बियाण्यांच्या अंकुरण, वाढीचा दर, पौष्टिक मूल्य आणि अनुवंशिक बदलांवर लक्ष ठेवले जाणार आहे.
भविष्यात हे प्रयोग चंद्र किंवा मंगळ वसाहतीत अन्ननिर्मितीचा पाया ठरू शकतात!
शुंभाशू शुक्ला : भारताचा आत्मविश्वास
शुंभाशू शुक्ला हे केवळ भारताचे प्रतिनिधित्व करत नाहीत, तर भारतीय शेतकऱ्यांच्या मेहनतीची आणि विज्ञानातील नवसंशोधनाची गोष्ट जगासमोर ठेवत आहेत.
या प्रयोगातून पुढे येणारे निष्कर्ष हे भारताला अंतराळातील अन्न स्वावलंबन आणि व्यावसायिक अंतराळ स्थानक बांधण्याच्या दिशेने पुढे नेत आहेत.
निष्कर्ष : अंतराळ शेतीची नांदी!
मुग आणि मेथी ही भारतातील पारंपरिक, पौष्टिक आणि औषधी गुणधर्म असलेली पिकं आता अंतराळातही आपली छाप सोडणार आहेत. ही फक्त एक वैज्ञानिक कामगिरी नाही, ही आहे शेतकऱ्यांपासून अंतराळापर्यंत पोहोचलेली भारताची प्रगती!
तुम्हाला वाटतं का, भविष्यात तुमच्या शेतात उगवणारी मूग चंद्रावरही उगवेल? कमेंटमध्ये नक्की सांगा!
हा लेख शेअर करा आणि भारताच्या अंतराळ सफरीचा अभिमान सर्वांपर्यंत पोहोचवा!



