Tuesday, October 21, 2025
spot_imgspot_imgspot_img
₹0.00

No products in the cart.

Homeयोजनापीएम किसान मानधन योजना: शेतकऱ्यांना दरमहा ₹3,000 पेन्शनची हमी, पात्रता, फायदे व...

पीएम किसान मानधन योजना: शेतकऱ्यांना दरमहा ₹3,000 पेन्शनची हमी, पात्रता, फायदे व अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती

शेतकरी शेतामध्ये दिवस-रात्र काबाडकष्ट करतात , पण त्यांना वृद्धापकाळात आर्थिक असुरक्षितेचा सामना करावा लागतो . यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकर्‍यांसाठी अनेक योजना राबवत असत . शेतकर्‍यांना आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारने 2019 ला पीएम किसान मानधन योजना सुरू केली . या योजनेद्वारे शेतकऱ्यांना 60 वर्षांनंतर दरमहा ₹3,000 पेन्शन मिळते. ही पेन्शन मिळवण्यासाठी शेतकर्‍याला दरमहा 55 ते 200 रुपये जमा करावे लागतात .

ही रक्कम शेतकर्‍याच्या वयानुसार वेगवेगळी आहे. जर शेतकऱ्याचे वय 18 वर्षे असेल तर त्याला दर महिन्याला फक्त ₹55 जमा करावे लागतील. 21 वर्षे वयोगटातील शेतकर्‍याला दर महिन्याला ₹100 तर 40 वर्षे वय असलेल्या शेतकऱ्यांना दर महिन्याला ₹200 जमा करावे लागतील. या योजनेतील विशेष बाब म्हणजे शेतकरी ज्या प्रमाणे दरमहा हप्ता भरतो, त्याच प्रमाणात केंद्र सरकारही तितकीच रक्कम त्याच्या पेन्शन खात्यात जमा करते.

लहान व अल्पभूधारक शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दरमहा ₹55 जमा करावे लागतात. त्यानंतर सरकार देखील त्यात ₹55 जमा करते. अशा प्रकारे तुमच्या खात्यात दरमहा एकूण ₹110 जमा होत असतात.

योजनेची पात्रता

  • लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे.
  • वयाची अट: अर्जदाराचे वय 18 ते 40 वर्षे असावे.

कोणाला लाभ मिळणार नाही

  • राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS), ईपीएफ (EPF) सारख्या इतर पेन्शन योजनांशी जोडलेले शेतकरी.
  • मोठे जमीनदार.
  • संविधानिक पदांवर असलेले किंवा राहिलेले व्यक्ती.
  • विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार.
  • केंद्र किंवा राज्य सरकारी कर्मचारी.
  • डॉक्टर, इंजिनिअर, वकील यांसारखे व्यावसायिक.

अर्ज प्रक्रिया:

  • जवळच्या CSC सेंटरला भेट द्या
  • अर्ज करताना आधार कार्ड, बँक खाते पासबुक, मोबाईल नंबर आणि पासपोर्ट आकाराचे फोटो आवश्यक असते.
  • ऑनलाईन अर्ज भरतील
  • बँकेतून मासिक हप्ता ऑटो डेबिट होईल (LIC मार्फत)
  • पडताळणीनंतर तुम्हाला युनिक पेन्शन नंबर मिळतो

अर्जासाठी लागणारी कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • ओळखपत्र
  • बँक खाते पासबुक
  • पत्रव्यवहाराचा पत्ता
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचे छायाचित्र

जर शेतकरी या योजनेत सहभागी झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या पत्नी किंवा पतीला पेन्शनचा लाभ मिळतो. ही योजना शेतकर्‍यांसाठी खूप उपयुक्त आहे . अशा प्रकारे ही योजना केवळ शेतकऱ्यालाच नव्हे तर त्याच्या कुटुंबालाही आर्थिक सुरक्षेचा आधार आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments