अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापारी संबध सध्या ऐताहासिक अशा निचांकी पातळीवर उतरला आहे , अमेरिकेचे अध्यक्ष ड्रोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूवरील आयात शुल्क (टॅरिफ) दुपट्ट करण्याचा निर्णय घेतल्यामुळे या वाढवल्यामुळे टॅरिफमुळे भारतीय निर्यात करणार्यांच्यावर अचानक मोठी आव्हानात्मक स्थिति निर्माण झालेली आहे

टॅरिफ म्हणजे काय ?
टॅरिफ म्हणजे एखादी वस्तू परदेशातून आपल्या देशात आयात केली जाते तेव्हा सरकार त्या वस्तूवर लावणारा कर. हा “आयातकर” म्हणजे परकीय वस्तूंवर लावलेले आर्थिक शुल्क, ज्यामुळे त्या वस्तूची किंमत वाढते
वॉलमार्ट आणि ॲमेझॉन
त्याच पार्श्वभूमीवर अमेरिकेतील आघाडीच्या दोन रिटेल कंपन्या वॉलमार्ट आणि ॲमेझॉन यांनी भारतातून येणाऱ्या काही उत्पादनांच्या ऑर्डर्स तात्पुरत्या स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढीव टॅरिफमुळे नफा घटण्याची आणि वस्तूंच्या किंमती वाढल्याने ग्राहकांची खरेदी कमी होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी हा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, टॅरिफ लागू झाल्यानंतर केवळ दोन दिवसांतच काही विशिष्ट श्रेणीतील मालवाहतूक थांबवण्यात आली आहे. तयार कपडे, घरगुती वस्तू व दैनंदिन उत्पादनांमध्ये भारताचा मोठा वाटा होता. मात्र ऑर्डर थांबल्याने लघुउद्योग, कारखाने आणि पुरवठा साखळीतील मजुरांच्या रोजगारावर धोका निर्माण झाला आहे.
बासमती तांदळावरही परिणाम
भारतातून अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीमध्ये कपडे, मसाले, रसायने, लाकडी फर्निचर, अन्नधान्य आणि स्टील यांचा मोठा वाटा आहे. यापैकी अन्नधान्य गटात बासमती तांदूळ हा सर्वाधिक प्रमाणात निर्यात होणारा घटक आहे. त्यामुळे वाढीव टॅरिफचा परिणाम बासमती तांदळावर सर्वाधिक लागणार आहे, ज्याचा थेट परिणाम शेतकरी, निर्यातदार आणि संबंधित उद्योगांवर होऊ शकतो.
किंमत जास्त झाल्यास अमेरिकन आयातदार स्वस्त पर्यायांचा शोध घेतील, जसे की पाकिस्तान, थायलंड किंवा व्हिएतनाममधून मिळणारा तांदूळ. यामुळे भारतातून होणारी बासमती तांदळाची निर्यात घटण्याची शक्यता आहे. निर्यात कमी झाली तर भारतीय बाजारात तांदळाचा साठा वाढेल, आणि मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाल्याने देशांतर्गत बाजारात शेतकऱ्यांना कमी भाव मिळेल.
याचा परिणाम फक्त शेतकऱ्यांपुरता मर्यादित न राहता संपूर्ण पुरवठा साखळीवर होईल — जसे की तांदूळ प्रक्रिया करणारे मिल, पॅकिंग युनिट्स, ट्रान्सपोर्ट सेवा आणि निर्यातसंबंधित लॉजिस्टिक कंपन्या यांच्याही उत्पन्नावर परिणाम होईल. दीर्घकालीन पातळीवर हे भारताच्या बासमती तांदळाच्या जागतिक बाजारातील स्पर्धात्मक स्थानालाही धक्का पोहोचवू शकते.
भारत हा जगातील सर्वात मोठा बासमती तांदळाचा निर्यातदार आहे , तर अमेरिका हा देश बासमती तांदळाचा महत्त्वाचा ग्राहक आहे , amazon आणि Walmart हे मोठे रिटेलर आहेत , तर टॅरिफ जास्त लावल्यामुळे त्यांनी ही आयात करण्यात येणार्या ऑर्डरस थांबवल्या गेल्या .



