महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक योजना राबवत असत . त्यामध्ये नमो शेतकरी महासनमान निधी योजना ही अत्यंत महत्त्वाची योजना मानली जाते. नमो शेतकरी महासन्मान निधि योजनेअंतर्गत सातव्या हप्त्यासाठी एकूण 1932 कोटी 72 लाख रु मंजूर करण्यात आले आहे. शासनाच्या कृषि विभागाकडून हा निर्णय जारी केला आहे . महाराष्ट्र राज्याच्या या नमो शेतकरी महासन्मान निधि योजनेअंतर्गत एकूण 6 हप्ते शेतकर्याच्या खात्यात जमा झाले आहेत , तर 7 व्या हप्त्याची वाट शेतकरी अनेक दिवसांपासून पाहत आहेत
कोणाला लाभ मिळणार ?
नमो शेतकरी महासन्मान निधि योजनेचा लाभ त्याच शेतकर्यांना मिळणार ज्या शेतकर्यांचा समावेश पंतप्रधान शेतकरी सन्मान निधि योजनेत आहेत . आणि या योजनेअंतर्गत 92 लाख 36 हजार शेतकर्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे .
शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली होती. या योजनेचा हप्ता एप्रिल ते जुलै या कालावधीतील आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना तो जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, हप्ता न मिळाल्याने शेतकऱ्यांना सप्टेंबरपर्यंत वाट पाहावी लागली. यामुळे अनेक शेतकऱ्यांना ही योजना बंद झाली की काय अशी शंका वाटू लागली होती. मात्र, आता हा संभ्रम दूर झाला असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2000 ची रक्कम जमा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सातत्याने होत असलेल्या चौकशीनंतर अखेर सरकारकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे राज्य शासनाने तातडीने निर्णय घेतला असून आता ९ सप्टेंबर किंवा 10 संप्टेंबर २०२५ ला हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्याची प्रक्रिया (Direct Benefit Transfer – DBT) सुरू होणार आहे. वितरण अधिक सुरळीत व वेळेत होण्यासाठी आवश्यक असलेले FTO (Fund Transfer Order) तयार करण्याची कार्यवाहीही वेगाने सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.
नमो शेतकरी महासनमान योजनेच्या हप्त्याची प्रतिक्षा शेतकऱ्यांना जरी जास्त काळ करावी लागली असली, तरी अखेर हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे . , नमो शेतकरी महासनमान योजना ही शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी मोठे पाऊल आहे. सप्टेंबरमध्ये मिळणारा हा हप्ता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिलासा आणि आनंदाचे हास्य फुलवणारा ठरणार आहे.



