नेपाळमध्ये काही दिवसांपासून तरुणांनी सुरु केलेल्या आंदोलनाकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेत आहे. या आंदोलनामागचं मुख्य कारण हि सोशल मीडियावर सरकारनं लावलेली बंदी, भ्रष्टाचार आणि घराणेशाही विरोधातील असंतोष हि आहेत. दिनांक 8 सप्टेंबरला नेपाळमध्ये आंदोलन सुरु झाले. यामध्ये आंदोलन करणारे हे शाळा व कॉलेज करणारे विद्यार्थी होते. हे आंदोलन इतकं हिंसक बनलं कि पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. तसेच संसद भावनासह सरकारी इमारतींना, कार्यालये, आणि नेत्यांच्या घरावर हल्ले केले व जाळपोक सुरु केली.
काही मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. आतापर्यंत या आंदोलनात 19 जणांचा मृत्यू झालेला आहे तर शेकडो आंदोलक आणि पोलीस जखमी असल्याचं सांगितलं जातंय.
आंदोलनामागची करणे :

1) सोशल मीडियावर बंदी –
सोशल मीडियाच्या बंदीमुळेच नेपाळमध्ये आंदोलनाची पहिली ठिणगी पडली. नेपाळ सरकारनं 4 सप्टेंबर ला फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर, इंस्टाग्राम, युट्युब, लिंक्डइन सारख्या तब्बल 26 अँप वर बंदी घातली. या निर्णयामुळे नेपाळमधील जनतेत आणि विशेषतः रोज सोशल मीडिया वापरणारे GEN-Z सरकारविरोधात राग निर्माण झाला. सरकारी बंदी घातल्याने तरुणांना वाटलं कि, ‘हे त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आघात आहे’ आणि याच प्रतिक्रिया देशभर उमटल्या. शिक्षण, नोकरीच्या संधी, व्यवसाय, मनोरंजन, हे सोशल मीडियावर अवलंबून असल्यामुळे रोष वाढला. सुरुवातीला शांततेत झालेल्या आंदोलन परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागलीनेपाळची राजधानी काठमांडू येथे हजारोच्या संख्येने तरुण जमले आणि आंदोलनाला सुरुवात केली.
2) भ्रष्टाचार आणि घराणेशाही –
नेपाळमधील तरुणांचा संताप हा केवळ सोशल मीडिया नव्हता तर यामागे भ्रष्टाचार आणि घराणेशाही या कारणांचा देखील समावेश होता. नेपाळमध्ये काही दिवसांपासून सोशल मीडियावर Nepo Kids आणि Nepo Baby हे हॅशटॅग ट्रेंड करत होते.
एकीकडे सामान्य नागरिक महागाई, बेरोजगार आणि त्यांना मूलभूत सुविधा नाहीत , तसेच सामान्य नागरिकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे आणि दुसरीकडे मंत्री आणि नेत्यांची मुले परदेशात चांगलं शिक्षण घेतात आणि ते त्यांचं आयुष्य अलीशान जगत आहेत , त्यांच्याकडं महागड्या गाड्या, ब्रँडेड वस्तू वापरतात हे सर्व आपण दिलेल्या टॅक्स मधून जात आहे अशी भावना या आंदोलनकर्त्यांमध्ये होती.विशेष म्हणजे, काठमांडूचे महापौर बालेन शाह यांच्याकडे आंदोलनकर्त्यांनी राजकीय नेतृत्व करण्याची मागणी केली आहे. तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या शाह यांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला असला तरी ते प्रत्यक्ष रस्त्यावर उतरलेले नाहीत
या आंदोलनादरम्यान हिंसाचार झाला, अनेक सरकारी इमारतींना आग लावण्यात आली आणि देशात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने व विरोधकांचा दबाव वाढल्याने अखेर ओलींना राजीनामा द्यावा लागला. या निर्णयामुळे आता नेपाळच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता आहे.तरुणाईने उभारलेला संघर्ष केवळ सोशल मीडिया बंदीविरोधापुरता मर्यादित राहिला नाही, तर तो लोकशाही व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी झालेला व्यापक उठाव ठरला.



