सध्या सोशल मीडियावर एक विडिओ तूफान वायरल होत आहे . या विडिव्होमध्ये एक शेतकरी दाम्पत्य स्वतः नांगर हातात घेऊन बैलांशिवाय शेती करत असल्याचा आहे . या व्हिडिओमध्ये ७६ वर्षीय वृद्ध शेतकरी अंबादास पवार स्वतःच्या खांद्यावर बैलजोडीप्रमाणे ‘जू’ घेत नांगर ओढताना दिसतात, तर त्यांची पत्नी मुक्ताबाई आपल्या हातात नांगर धरून त्या जमिनीला नांगरताना दिसतात. हे दृश्य बघून अनेकांच्या डोळ्यात पाणी आल .
महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील ७६ वर्षीय शेतकरी अंबादास पवार यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दिसते, की अंबादास पवार स्वतःच्या खांद्यावर बैलजोडीप्रमाणे ‘जू’ घेत नांगर ओढत आहेत, तर त्यांच्या पत्नी मुक्ताबाई पवार त्या नांगराला हात घालत आहेत..
त्यांच्याकडे ना ट्रॅक्टर, ना बैल, ना कोणतीही यांत्रिक मदत. सर्वात वेदनादायक बाब म्हणजे – फार्मर आयडी नसल्यामुळे त्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नव्हता.
बैल खरेदी करण्यासाठी पैसा नव्हता, रोजगाराचं ठोस साधन नव्हतं, म्हणून त्यांनी स्वतःच बैल बनण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले की, “आजपर्यंत एकही शासकीय योजना मला मिळालेली नाही.” एवढंच नाही तर, त्यांच्यावर सध्या ₹४०,००० कर्ज आहे. त्यामुळे उदरनिर्वाह करण्यासाठी काहीतरी केलेच पाहिजे” या विचाराने अंबादास पवार यांनी जू खांद्यावर घेऊन पत्नीच्या मदतीने शेत नांगरण्यास सुरुवात केली. हे दृश्य कोणीतरी कॅमेऱ्यात कैद केलं आणि काही वेळातच ते सोशल मीडियावर व्हायरल झालं.
त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा पुण्यात नोकरीला आहे आणि मुलीचं लग्न झालेलं आहे. पण वृद्धापकाळातही अंबादास आणि त्यांची पत्नी मुक्ताबाई स्वतःच शेत नांगरून पोटासाठी संघर्ष करत आहेत.

सोनू सूदचा तात्काळ प्रतिसाद
अंबादास पवार यांचा स्वतःच्या खांद्यावर जू घेऊन नांगरताना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर अनेकांचे मन हेलावले. गरजूंसाठी नेहमी पुढे असणारे अभिनेता सोनू सूद यांनीही यात लक्ष घालून, “कृपया आपला नंबर पाठवा, मी बैल पाठवतो” असा भावनिक संदेश ‘X’वरून दिला. काहींनी ट्रॅक्टरचा सल्ला दिल्यावर त्यांनी स्पष्ट केलं की, “शेतकरी भावाला ट्रॅक्टर चालवता येत नाही, त्यामुळे बैलच योग्य राहील.” ही मदत केवळ आर्थिक नव्हे, तर परिस्थिती समजून दिलेली खरी साथ होती.
चार बिघे कोरडवाहू जमीन, नाही बैल, नाही ट्रॅक्टर – आता मिळणार १.२५ लाखांचे अनुदान
अंबादास पवार यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी लक्ष घालून तात्काळ मदतीचे आश्वासन दिले. पाटील यांनी पवार यांच्याशी थेट फोनवर संवाद साधला. त्यानंतर लातूरचे कृषी अधिकारी सचिन बावगे यांनी भेट देत माहिती घेतली. अंबादास पवार यांच्याकडे चार बिघे कोरडवाहू जमीन असून, सिंचन, बैल किंवा यंत्रसामग्री नाही. कृषी ओळखपत्र नसल्याने योजनांचा लाभ मिळत नव्हता. आता ओळखपत्राची प्रक्रिया सुरू झाली असून, शासनाच्या अनुदान योजनेंतर्गत त्यांना ट्रॅक्टर, शेती उपकरणे व १.२५ लाखांची मदत लवकरच मिळणार आहे.



