Saturday, October 25, 2025
spot_imgspot_imgspot_img
₹0.00

No products in the cart.

Homeपीक लागवड मार्गदर्शनNew GST Slab 2025: आता फक्त 5% आणि 18% – जाणून घ्या...

New GST Slab 2025: आता फक्त 5% आणि 18% – जाणून घ्या काय होणार स्वस्त, काय महाग

नवी दिल्ली येथे जीएसटी कौन्सील ची बैठक पार पडली . केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी 3 sep ला जीएसटी बद्दल एक मोठी घोषणा केली , त्यांनी जीएसटी च्या दरामध्ये बदल केल्याच जाहीर केल . आपल्या भारत देशामध्ये 2017 साली जीएसटी लागू केला होता . त्यामध्ये एकूण जीएसटी चे 4 स्लॅब होते , पण यामध्ये बदल करण्यात आले आहेत . आधी 5%,12%,18%,आणि 28% असे 4 स्लॅब होते पण त्यातील 12 टक्क्याचा आणि 28 टक्क्याचा स्लॅब रद्द करण्यात आला आहे त्यामुळे देशात इथून पुढे फक्त 5 टक्के आणि 18 टक्के हे दोन च जीएसटी स्लॅब असतील . जीएसटी चे हे नवीन दर 22 संप्टेंबर पासून लागू होतील . या नव्या जीएसटी दारमुळे शेतकरी , सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे .

दिल्ली येथे पार पडलेल्या 56 व्या जीएसटी कौन्सील च्या बैठकीत नव्या टॅक्स चा प्रस्ताव केला , यामधील 12% आणि 28% चा स्लॅब रद्द केला . यामध्ये दैनंदिन वापरातील वस्तूंवरील टॅक्स हा कमी आहे तर महागड्या आणि हानिकारक वस्तूंवर 40% इतका टॅक्स लागू केला गेला आहे . आता २८% करदरातील बर्‍याच वस्तू थेट १८% स्लॅबमध्ये आणण्यात आल्या आहेत, तर १२% करदरातील वस्तू ५% स्लॅबमध्ये गेल्या आहेत. शेतीसाठी लागणारे अनेक पूरक सामान, दैनंदिन गरजेच्या वस्तू आणि ग्रामीण भागात जास्त वापरल्या जाणाऱ्या वस्तु आता स्वस्त होणार आहेत

५% जीएसटी स्लॅबमधील वस्तू

दैनंदिन वापर – केसांचे तेल, शॅम्पू, टूथपेस्ट, साबण, भांडी, नॅपकिन्स, दूध-तूप-दही, चीज.

आरोग्य – थर्मामीटर, ऑक्सिजन उपकरणे, डायग्नॉस्टिक किट्स, ग्लुकोमीटर.

कृषी – ट्रॅक्टर टायर, पार्ट्स, सिंचन यंत्रणा, स्प्रिंकलर.

खाद्यपदार्थ – मासे, साखर, चॉकलेट, पास्ता, कॉर्नफ्लेक्स, नूडल्स, बिस्किटे, जॅम, जेली, सुकेमेवे, आईस्क्रीम, मिठाई.

इतर – सायकल, हस्तकला वस्तू, बांबू फर्निचर, कंगवे, छत्र्या, कपडे (₹२५०० पर्यंत), चपला.

१८% जीएसटी स्लॅबमधील वस्तु

लहान पेट्रोल/डिझेल कार, तीन चाकी वाहने, 350cc खाली मोटारसायकली, मालवाहतूक वाहने

एसी, LED/LCD टीव्ही, मॉनिटर, प्रोजेक्टर, डिशवॉशर, वॉशिंग मशीन

₹2500 पेक्षा जास्त किंमतीचे कपडे

सिमेंट, कोळसा, ग्राफिक पेपर

40% जीएसटी स्लबमधील वस्तु

पान मसाला, गुटखा, सिगरेट, बीडी, तंबाखू उत्पादने

कॅफिनयुक्त व अल्कोहोल नसलेले ड्रिंक्स, स्मोकिंग पाईप, रिहॉल्टर, पिस्तूल

350cc पेक्षा जास्त क्षमतेच्या बाईक्स, खाजगी विमानं, बोटी

कॅसिनो, जुगार, घोड्यांच्या शर्यती

लॉटरी व ऑनलाइन मनी गेमिंग

0% जीएसटी स्लबमधील वस्तु

जीवनरक्षक व कॅन्सरची औषधे , दुर्मिळ आजारांची औषधे

वैयक्तिक जीवन विमा व आरोग्य पॉलिसी

शैक्षणिक साहित्य – नकाशा, चार्ट, ग्लोब, पेन्सिल, शार्पनर, क्रेयॉन्स, अभ्यासाची पुस्तके, वही, खोडरबर

पॅक दूध, पनीर , पाव, खाखरा, चपाती, पराठा

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments