साखर उद्योग प्रोत्साहन योजना:राज्यातील सहकारी तसेच खाजगी साखर कारखान्यांची कार्यक्षमता बनण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम बनवण्यासाठी, या उद्देशाने राज्य शासनाने साखर कारख्यान्यांसाठी विशेष प्रोत्साहन योजना जाहीर केली गेली आहे. आणि या योजनेमुळे साखर उद्योगात गुणवत्ता, शिस्त आणि पारदर्शकतेला चालना मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आणि सहकारी साखर कारखानदारीच्या हीरक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून हि योजना राबवण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत कारखान्यांच्या एकूण कामगिरीचे मूल्यमापन करून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कारखान्यांना सन्मान व वार्षिक पारितोषिक दिले जाणार आहे. या पारितोषकासाठी पात्र ठरणाऱ्या कारखान्यांची निवड पारदशक आणि निश्चित प्रक्रियेद्वारे केली जाणार आहे. पारितोषिक विजेत्यांची निवड करण्यासाठी द्विस्तरीय समितीची रचना करण्यात अली आहे. या समितीच्या पहिल्या स्तरावर अध्यक्ष साखर आयुक्त असतील, तर अंतिम निवड करणाऱ्या समितीचे अध्यक्ष सहकार मंत्री असतील.
समितीची रचना
प्रस्तावांचे प्राथमिक मूल्यमापन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या छाननी समितीत खालील सदस्यांचा समावेश आहे :
- साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य (पुणे) – अध्यक्ष
- संचालक (प्रशासन), साखर आयुक्तालय, पुणे – सदस्य
- संचालक (अर्थ), साखर आयुक्तालय, पुणे – सदस्य
- वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI), पुणे येथील एक प्रतिनिधी – सदस्य
- महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ (साखर संघ) यांचेकडील एक प्रतिनिधी – सदस्य
- अर्थव्यवस्था, अभियांत्रिकी किंवा कृषी क्षेत्रातील साखर उद्योगातील दोन स्वतंत्र तज्ज्ञ – सदस्य
- सहसंचालक (प्रशासन), साखर आयुक्तालय, पुणे – सदस्य सचिव
छाननी समितीने सादर केलेल्या प्रस्तावांच्या आधारे निवड समिती अंतिम टप्प्यात तीन सर्वोत्तम सहकारी आणि तीन सर्वोत्तम खासगी साखर कारखान्यांची निवड करणार आहे. या निवड झालेल्या कारखान्यांना देण्यात येणाऱ्या पारितोषिक किंवा बक्षिसांच्या रकमेबाबत मात्र अद्याप कोणताही अंतिम निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.
कोणत्या निकषांवर होणार मूल्यमापन?
या प्रोत्साहन योजनेत साखर कारखान्यांचे मूल्यमापन विविध महत्त्वाच्या घटकांवर केले जाणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पुढील बाबींचा समावेश आहे:
- गेल्या सलग तीन वर्षांतील एफआरपी (Fair and Remunerative Price) वेळेवर अदा
- साखर उतारा व प्रतीहेक्टरी ऊस उत्पादन
- कृत्रिम बुद्धिमत्ता व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
- सर्वाधिक क्षेत्रात काढणी व कार्यक्षमता
- कमी कार्बन उत्सर्जन व पर्यावरणपूरक उपाय
- उच्च कार्बन क्रेडिट्स मिळवण्याची क्षमता
- शासकीय कर्जाची वेळेवर परतफेड
- कामगार संख्या मर्यादा, वेतन वितरणातील शिस्त
- एकूण आर्थिक व्यवस्थापन
साखर उद्योग प्रोत्साहन योजना
- ५,००० मेट्रिक टन प्रतिदिन (TCD) पेक्षा कमी क्षमतेचे कारखाने
- ५,००० मेट्रिक टन प्रतिदिन (TCD) पेक्षा जास्त क्षमतेचे कारखाने
या दोन गटांमधून प्रत्येकी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कारखान्यांना पारितोषिक दिले जाणार असून, एकूण सहा साखर कारखाने सन्मानित केले जाणार आहेत.
साखर कारखान्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रोत्साहन योजनेत समिती रचनेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे,यामुळे साखर उद्योगात स्पर्धात्मकता वाढून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कारखान्यांना योग्य सन्मान मिळणार आहे.
हे ही वाचा : उमेद महिला बचत गटामुळे लाखो ग्रामीण महिला स्वावलंबी; अनेक ‘लखपतीदीदी’ बनल्या
