Flax seed- जवस याला आळशीच्या बिया आस देखील म्हणतात , अलीकडच्या काळात जवसाला सुपर फूड लोकप्रियता मिळाली आहे कारण यामध्ये भरपूर प्रमाणात आढळणार्या ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स उपलब्धी मुळे या बिया जर आपण दैनंदिन आहारात समाविष्ट केला तर हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स तर आहेच पण या व्यतिरिक्त प्रोटीन , फायबर , विटामिन बी , विटामीन बी6 , विटामीन ई , मॅग्नेशियम , कॅल्शियम , फोस्फोरस , झिंक यांचे प्रमाण खूप चांगले आहे , त्यामुळे हृदय विकार टाळण्यासाठी , रक्तदाब नियंत्रणासाठी , पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या बियांमध्ये लीगनान्स(lignans) नावाचं फाईटोअस्ट्रोजेन असतात.जे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी मदत करते . त्यामुळे महिलांच्या हार्मोनल आरोग्यासाठी फायदेशीर ठरते .
फायदे
1) जवसामध्ये खूप प्रमाणात फायबर उपलब्ध असतात विशेषता सोलूबल फायबर ज्यामुळे पचनसंस्था निरोगी राहते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते
2) यामध्ये फायबर आणि हेल्दी फॅटस असल्यामुळे पोत जास्त वेळ भरल्यासारखं ठेवत आणि भूक लागत नाही आणि त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते
3) जवसांच्या बियांमध्ये अॅंटीकॅन्सर गुणधर्म असतात , विशेषता महिलांमधील स्तनाचा कर्करोग व गर्भाशयाचा कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात
4) जवसाच्या बिया डायबीटीस (मधुमेह) रुग्णासाठी खूप उपयुक्त आहे . त्या रक्तातील साखर नियंत्रित ठेवतात कारण या बियांमुळे इंसुलिनची सेंसिटीविटी सुधारण्यास मदत करते .
5) जवसाच्या बियांमध्ये असलेले ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स आणि फायबर हृदयासाठी खूप चांगले असतात. या बियांमुळे रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतो आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. त्यामुळे हृदय मजबूत राहते आणि रक्तदाबही नियंत्रणात राहतो.
6) जवसाच्या बिया त्वचेसाठी खूप उपयुक्त आहेत. यातले ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स त्वचा मऊ आणि चमकदार ठेवतात, तर अँटीऑक्सिडंट्समुळे पिंपल्स कमी होतात आणि चेहऱ्यावरील काळे डागही हळूहळू कमी होतात. त्यामुळे त्वचा नैसर्गिकरीत्या निरोगी आणि सुंदर दिसते.तसेच यामुळे केस गळणे कमी करून त्यांना मजबूत, दाट आणि चमकदार बनवतात.
7) सामान्यतः ओमेगा-३ फॅटी ॲसिड्सचे उत्तम स्त्रोत मासे मानले जातात, पण शाकाहारी लोकांसाठी अशावेळी जवसाच्या बिया (Flax Seeds) हा एक उत्तम नैसर्गिक पर्याय आहे .

जवसाच्या बिया खाण्याचे योग्य मार्ग
बियांच्या वरचं कवच पचत नाही, म्हणून त्या भाजून किंवा पावडर करून खाल्ल्या तर पोषकतत्वं शरीराला मिळतात
हलक्या आचेवर भाजून खाल्ल्यास त्या चवदार लागतात आणि सहज पचतात. बिया बारीक करून त्यांची पावडर दुधात, दह्यात, स्मूदी किंवा शेकमध्ये मिसळून घेता येते. तसेच सलाड किंवा सूपवर टॉपिंग म्हणून वापरल्यास त्याची चव आणि पौष्टिकता वाढते. याशिवाय जवसाच्या बियाचे पीठ कोणत्याही पिठात मिसळून भाकरी किंवा पराठे बनवले तर ते अधिक आरोग्यदायी होतात.



