Saturday, October 25, 2025
spot_imgspot_imgspot_img
₹0.00

No products in the cart.

Homeकृषी गुणधर्मDragon Fruit (ड्रॅगन फळ) चे आरोग्यदायी फायदे | आरोग्यासाठी सुपरफूड

Dragon Fruit (ड्रॅगन फळ) चे आरोग्यदायी फायदे | आरोग्यासाठी सुपरफूड

Dragon Fruit –

आजच्या धावपळीच्या जगात आपलं आरोग्य टिकवण्यासाठी योग्य तो पोषण आहार घेणं आवश्यक आहे. तर आज आपण ड्रॅगन फ्रुट या बद्दल माहिती घेणार आहोत. ड्रॅगन फ्रुट हे आजकाल झपाट्याने लोकप्रिय होत आहे. यांच्यामध्ये असलेल्या पोषणमूल्ये यामुळे या फळाला बाजारात चांगली मागणी आहे. मराठीमध्ये या फळाला विशेषतः ‘ड्रॅगन फळ” असेच म्हणतात, पण हिंदी व संस्कृत भाषेत याला “कमलम” असे म्हणतात, कारण या फळाचा आकार कमळासारख्या दिसतो. हे फळ दिसायलाही आकर्षक दिसत आणि खायलाही चविष्ट आहे. फक्त चविष्ट नव्हे तर आरोग्यासाठीहि याचे फायदे आहेत.

भारतामध्ये गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांनी या फळांची लागवड सुरु केली असून महाराष्ट्रामध्ये याचं उत्पन्न वाढत आहे. तर महाराष्ट्रामध्ये सोलापूर, सांगली, पुणे, नाशिक या भागांत शेतकरी मोठ्या प्रमाणात ड्रॅगन फ्रुट ची लागवड करत आहेत.

या फळामध्ये विटॅमिन सी, कॅल्शिअम, फायबर, अँटिऑक्सिडंट्स यामुळे हे फळ आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.

फायदे :

1) ड्रॅगन फ्रुट हे फळ रक्तातील साखरेचे प्रमाण करते. म्हणजे यामध्ये फायबर रक्तातील साखर हळूहळू शोषली जाते. म्हणून डायबीटीस रुग्णांसाठी हे फळ फायदेशीर मानले जाते.

2) यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. कारण या फळामध्ये Vit – C , आणि अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे वायरल आजार यामुळे संरक्षण मिळते.

3) यामध्ये ओमेगा 3, मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स व फायबर असतात, त्यामुळे ते कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवतात व हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

4) ड्रॅगन फळांमध्ये प्रोटिन्स, फायबर, लोह, मॅग्नेशिअम यांसारखे घटक असतात व या फळात कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असल्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी फार उपयुक्त ठरते.

5) या फळामध्ये अँटिऑक्सिडंट्स व फायटोकेमिकल्स असल्यामुळे शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करतात व यामुळे कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत होते.

6) ड्रॅगन फळामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे शरीराला हायड्रेट ठेवत.

7) अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C मुले त्वचा ताजीतवानी राहते, चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.

8) यामध्ये नैसर्गिक फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते.

9) ड्रॅगन फळ केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे कारण यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असल्यामुळे केस कमी गळतात.

10) यामध्ये फायबर गट हेल्थ सुधारते, त्यामुळे पोटातील चांगले जिवाणू वाढतात.

11) पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअममुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.

12) बीट कॅरोटीन आणि व्हिटॅमिन A असल्यामुळे दृष्टी सुधारते आणि डोळ्यांचा ताण कमी होतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments