आपल्या भारतीय संस्कृतीत श्रावण महिन्याला एक विशेष स्थान आहे . या काळात लोक महादेवाची पूजा , व्रत , उपवास करतात . अनेक घरांमध्ये या महिन्यात मांसाहार आणि मद्यपान पुर्णपणे बंद केल जात . सर्वजण हे श्रद्धेन करतात पण तुम्ही कधी विचार केला आहात का यामागे वैज्ञानिक कारण काय असतील ? तर यामागे फक्त धार्मिक च नाही तर शारीरिक , नैसर्गिक आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्व आहे. तर आपण या लेखात पाहू धार्मिक कथा आणि या मागच वैज्ञानिक कारण देखील.

या परंपरेमागील धार्मिक कथा आणि वैज्ञानिक कारण
धार्मिक कथा
श्रावण महिना हा महादेवाला समर्पित केला जातो. समुद्रमंथनात निघालेलं विष शंकरांनी पिलं आणि त्यानंतर त्यांना उष्णता जाणवली. ही उष्णता कमी करण्यासाठी देवतांनी गंगाजल व बेलपत्र अर्पण केले, आणि भक्तांनी उपवास सुरू केला. त्यामुळे श्रावणात शुद्ध, सात्विक जीवनशैली आणि संयम पाळण्याची परंपरा निर्माण झाली. या काळात निसर्गही नवजीवन घेतो, म्हणून शरीर-मन शुद्ध ठेवणं हेही त्यामागचं महत्त्वाचं कारण मानलं जातं.
वैज्ञानिक कारण
१. पावसाळ्यात बॅक्टेरिया आणि विषाणू वाढतात
- पावसाळ्यात वातावरणात खूप ओलावा आणि दमटपणा असतो.
- ही स्थिती बॅक्टेरिया व विषाणूंसाठी अनुकूल असते.
- त्यामुळे मांसाहारी पदार्थ लवकर खराब होतात .
- अशा अन्नामुळे फूड पॉइझनिंग, अपचन, जठरशोथ यासारखे आजार होऊ शकतात.
२. श्रावण महिना मास्यांच्या प्रजननासाठी महत्त्वाचा असतो
- श्रावणात अनेक जलजीव, विशेषतः मासे अंडी घालतात.
- हा त्यांचा प्रजननाचा कालावधी असतो.
- या काळात मोठ्या प्रमाणावर मासेमारी केल्यास त्यांची प्रजाती संकटात येऊ शकते.
- सरकार दरवर्षी 15 जून ते 15 ऑगस्ट दरम्यान मासेमारीवर बंदी घालते.
ही बंदी मोठ्या ट्रॉलर व बोटींसाठी असून, पारंपरिक मासेमारांना काही ठिकाणी मर्यादित परवानगी दिली जाते.
३. जैवविविधतेवर आणि अन्नसाखळीवर परिणाम
- मासेमारीमुळे नैसर्गिक आन्नसाखळी (Food Chain) विस्कळीत होते.
- एकाच प्रजातीची संख्या कमी झाली, तर इतर प्रजातींवरही परिणाम होतो.
- पर्यावरणीय समतोल बिघडण्याचा धोका निर्माण होतो.
४. श्रावण महिन्यात मद्यपान का टाळावे?
श्रावण महिन्यात शरीराची पचनशक्ती आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. अशा वेळी मद्यपान केल्यास लिव्हरवर ताण येतो, शरीरात डिहायड्रेशन होते आणि आजार होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे या महिन्यात मद्यपान टाळणं आरोग्यदृष्ट्या योग्य ठरतं.
पावसाळ्यात पालेभाज्यांचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते.
पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते, आणि मोठ्या प्रमाणात ताज्या आणि सहज उपलब्धही असतात. या हंगामात मेथी, पालक, शेपू, लाल माठ यांसारख्या भाज्या बाजारात भरपूर प्रमाणात मिळतात आणि त्या पचायला हलक्या असल्यामुळे पावसाळ्यात मंदावलेल्या पचनशक्तीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. या भाज्यांमध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे (Vitamin A आणि C) भरपूर प्रमाणात असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबरोबरच त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठीही चांगल्या असतात. त्यामुळे पावसाळ्यात या भाज्यांचा आहारात समावेश केल्यास संपूर्ण आरोग्य सुधारते आणि नैसर्गिक पोषण मिळते.



