भारतातील शेतकर्यांसाठी कापूस हे एक महत्वाचे नगदी पीक आहे , कापसाचा बाजारभाव हा नेहमी चढ-उतार होत असतो. महाराष्ट्रामध्ये विदर्भ व मराठवाडा येथे मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली जाते . तर येथील शेतकर्यांचा कापसाच्या दारावर एकूण आर्थिक परिस्थिति अवलंबून असते. मागील हंगामात कापसाचा बाजारभाव हा कमी होता त्यामुळे शेतकर्यांवर आर्थिक संकट ओढवले होते
सध्याची बाजारस्थिती काय?
सध्या देशभरातील प्रमुख बाजारांमध्ये कापूस सरासरी ₹6,727 ते ₹6,927 प्रति क्विंटल दराने विकला जात आहे. मागणी तुलनेत कमी आहे, त्यामुळे भाव स्थिर राहिले आहेत. यामागे अनेक कारणे आहेत:
· जगभरातील बाजार थंडावलेला आहे.
· चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशसारख्या प्रमुख देशांकडून खरेदी मंदावली आहे.· आपल्या देशातही पुरेसा साठा नसल्याने व्यापाऱ्यांनी खरेदी थांबवली आहे.
शेतकर्यांची भूमिका
आता बहुतेक शेतकरी नवीन हंगामाची वाट पाहत आहेत. त्यामुळे सध्याच्या कालावधीत कापूस खरेदीला मंदी आलेली आहे. यामुळे जर शेतकऱ्यांकडे साठवलेला कापूस असेल, तर तो त्वरीत विकण्याची घाई करू नये. बाजारात योग्य दर मिळेपर्यंत संयम ठेवणे हे अधिक फायदेशीर ठरेल
जागतिक पातळीवरही स्थिती सध्या स्थिर आहे, परंतु तज्ञांचा अंदाज आहे की 2024-25 या वर्षात जागतिक उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. जगातील सर्वात मोठा कापूस उत्पादक देश म्हणजे अमेरिका, आणि त्यात टेक्सास राज्य हे कापूस उत्पादनाचं प्रमुख केंद्र मानलं जातं. मात्र सध्या तिथे कोरड्या हवामानामुळे आणि सलग १० दिवस पाऊस न झाल्यामुळे कापसाच्या पिकावर प्रतिकूल परिणाम होत आहे. या टंचाईच्या पार्श्वभूमीवर भारतातून कापसाची निर्यात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
· राजकोट स्पॉट मार्केट (कॅन्डी दर): ₹55,600
· 31 जुलै फ्युचर्स: ₹56,600/कॅन्डी
· 30 सप्टेंबर फ्युचर्स: ₹58,500/कॅन्डी
· 30 एप्रिल 2026 साठी (20 किलो): ₹9,145
टीप: 1 कॅन्डी = 356 किलो
शेतकऱ्यांना महत्त्वाचे सल्ले
1. सध्याच्या बाजारभावात विक्रीची घाई करू नका.
2. स्थानिक बाजार समित्यांवर लक्ष ठेवा.
3. शासकीय योजना, नाफेड खरेदी व MSP संधींचा फायदा घ्या.
तुमच्या भागात सध्या कापसाचे दर किती आहेत? कमेंट करून नक्की कळवा



