Saturday, October 25, 2025
spot_imgspot_imgspot_img
₹0.00

No products in the cart.

Homeयोजनादोन दुधाळ जनावरे वाटप योजना 2025 – ऑनलाईन अर्ज, लाभ व अनुदान...

दोन दुधाळ जनावरे वाटप योजना 2025 – ऑनलाईन अर्ज, लाभ व अनुदान माहिती

राज्य आणि केंद्र सरकार कडून शेतकर्‍यांसाठी शेती आणि शेती सलग्न व्यवसायासाठी योजना येत असतात ,त्यातच दुधाळ गाई आणि म्हशी वाटप अशी एक योजना आहे . ऑनलाइन पद्धतीने लाभार्थी निवडीची प्रक्रिया सुरू आहे , अर्जदाराना अर्ज करण्याची मुदत दि॰ 3 मे 2025 ते दि 2 जून 2025 पर्यंत होती पण आता ज्यांनी या कालावधी मध्ये अर्ज केला नाही त्या नवीन लाभार्थ्यांना नवीन नोंदणी व अर्ज करता येणार आहे.

 लाभार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर, पुढील टप्प्यात वेळापत्रकानुसार कागदपत्रे अपलोड करण्यासाठी स्वतंत्र कालावधी देण्यात येतो. त्यामुळे अर्ज केल्यानंतर वेळोवेळी अधिकृत वेबसाईट किंवा स्थानिक पशुसंवर्धन कार्यालयाकडून मिळणाऱ्या सूचना व वेळापत्रकावर लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य वेळी कागदपत्रे अपलोड न केल्यास अर्ज बाद होऊ शकतो. ही सुविधा फक्त यंदा (२०२५-२६) नव्याने अर्ज करणाऱ्यांसाठीच आहे.
२०२१-२२, २०२२-२३ किंवा २०२३-२४ मध्ये अर्ज केलेल्यांनी पुन्हा अर्ज करू नये.

अर्जदार प्राधान्य नियम

  • महिला बचत गटांचे सदस्य
  • 1 ते 2 हेक्टर पर्यंतचे अल्पभूधारक शेतकरी
  • रोजगार/स्वयंरोजगार कार्यालयात नोंद असलेले सुशिक्षित बेरोजगार

लाभार्थ्यांना मिळणारे आर्थिक सहकार्य

गाईसाठी प्रकल्प खर्चाचे तपशील (2 गायींचा गट)

बाब रक्कम (₹)
प्रत्येक गायीची किंमत ₹70,000/-
एकूण 2 गायींची किंमत ₹1,40,000/-
3 वर्षांचा विमा (10.20% + 18% सेवा करासह) ₹16,850/-
एकूण प्रकल्प किंमत ₹1,56,850/-

 

 

म्हशीसाठी प्रकल्प खर्चाचे तपशील (2 म्हशींचा गट)

बाब रक्कम (₹)
प्रत्येक म्हशीची किंमत ₹80,000/-
2 म्हशींची एकूण किंमत ₹1,60,000/-
3 वर्षांचा विमा (10.20% + 18% GST सह) ₹19,258/-
एकूण प्रकल्प खर्च ₹1,79,258/-

 

अनुसूचित जातीसाठी शासकीय अनुदान (शॉर्ट मध्ये):

 गायींचा गट (₹1,56,850):
  ▪️ अनुदान: ₹1,17,638 (75%)
  ▪️ स्वहिस्सा: ₹39,212 (25%)

 म्हशींचा गट (₹1,79,258):
  ▪️ अनुदान: ₹1,34,443 (75%)
  ▪️ स्वहिस्सा: ₹44,815 (25%)

 शासन 75% खर्च उचलते, लाभार्थ्याला फक्त 25% भरावा लागतो.

 

अनिवार्य कागदपत्रे (सर्व अर्जदारांसाठी):

  • फोटो ओळखपत्राची सत्यप्रत
  • 7/12 उतारा (सातबारा)
  • 8 अ उतारा
  • अपत्य दाखला / स्वयंघोषणा पत्र
  • आधारकार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • बँक खाते पासबुकाची झेरॉक्स
  • रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटुंबातील एकच अर्ज)

 असलेल्या अटींनुसार लागणारी कागदपत्रे:

  • 7/12 मध्ये नाव नसल्यास – कुटुंबाचे संमती पत्र / जमीन भाडे करारनामा
  • अनुसूचित जाती/जमाती असल्यास – जातीचा दाखला
  • BPL (दारिद्र्य रेषेखालील) प्रमाणपत्र
  • दिव्यांग असल्यास – दिव्यांग प्रमाणपत्र
  • बचत गट सदस्य असल्यास – गटाचे प्रमाणपत्र / गट बँक पासबुकची पहिली पाने

 अर्जदाराची पात्रता सिद्ध करणारी कागदपत्रे:

  • वयाचा पुरावा (जन्मतारीख)
  • शैक्षणिक पात्रतेचा दाखला
  • रोजगार / स्वयंरोजगार नोंदणी कार्ड
  • प्रशिक्षण घेतले असल्यास – प्रशिक्षण प्रमाणपत्र

 

अधिक माहितीसाठी संपर्क करा:

 पशुधन विकास अधिकारी (विस्तार)पंचायत समिती कार्यालय
  जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी / उपआयुक्तजिल्हा स्तरावरील कार्यालय
  कॉल सेंटर:  1962 (सकाळी 7 वाजता ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत)
  तांत्रिक अडचणीसाठी हेल्पलाइन:  8308584478 (संपर्क वेळ: सकाळी 10 ते संध्याकाळी 6)

 

अर्ज कसा कराल?

 https://ah.mahabms.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या
किंवा
  गुगल प्ले स्टोअर वरून “AH-MAHABMS” मोबाईल अ‍ॅप डाउनलोड करा.

 टॉप मेनूमधील  अर्जदार नोंदणी” या पर्यायावर क्लिक करा.

 आवश्यक माहिती भरून  नोंदणी पूर्ण करा.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments