aadhunikshetitantra.com

दोन दुधाळ जनावरे वाटप योजना 2025 – ऑनलाईन अर्ज, लाभ व अनुदान माहिती

Close-up view on the legs of farmer working with fresh grass at the animal barn

राज्य आणि केंद्र सरकार कडून शेतकर्‍यांसाठी शेती आणि शेती सलग्न व्यवसायासाठी योजना येत असतात ,त्यातच दुधाळ गाई आणि म्हशी वाटप अशी एक योजना आहे . ऑनलाइन पद्धतीने लाभार्थी निवडीची प्रक्रिया सुरू आहे , अर्जदाराना अर्ज करण्याची मुदत दि॰ 3 मे 2025 ते दि 2 जून 2025 पर्यंत होती पण आता ज्यांनी या कालावधी मध्ये अर्ज केला नाही त्या नवीन लाभार्थ्यांना नवीन नोंदणी व अर्ज करता येणार आहे.

 लाभार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर, पुढील टप्प्यात वेळापत्रकानुसार कागदपत्रे अपलोड करण्यासाठी स्वतंत्र कालावधी देण्यात येतो. त्यामुळे अर्ज केल्यानंतर वेळोवेळी अधिकृत वेबसाईट किंवा स्थानिक पशुसंवर्धन कार्यालयाकडून मिळणाऱ्या सूचना व वेळापत्रकावर लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य वेळी कागदपत्रे अपलोड न केल्यास अर्ज बाद होऊ शकतो. ही सुविधा फक्त यंदा (२०२५-२६) नव्याने अर्ज करणाऱ्यांसाठीच आहे.
२०२१-२२, २०२२-२३ किंवा २०२३-२४ मध्ये अर्ज केलेल्यांनी पुन्हा अर्ज करू नये.

अर्जदार प्राधान्य नियम

लाभार्थ्यांना मिळणारे आर्थिक सहकार्य

गाईसाठी प्रकल्प खर्चाचे तपशील (2 गायींचा गट)

बाब रक्कम (₹)
प्रत्येक गायीची किंमत ₹70,000/-
एकूण 2 गायींची किंमत ₹1,40,000/-
3 वर्षांचा विमा (10.20% + 18% सेवा करासह) ₹16,850/-
एकूण प्रकल्प किंमत ₹1,56,850/-

 

 

म्हशीसाठी प्रकल्प खर्चाचे तपशील (2 म्हशींचा गट)

बाब रक्कम (₹)
प्रत्येक म्हशीची किंमत ₹80,000/-
2 म्हशींची एकूण किंमत ₹1,60,000/-
3 वर्षांचा विमा (10.20% + 18% GST सह) ₹19,258/-
एकूण प्रकल्प खर्च ₹1,79,258/-

 

अनुसूचित जातीसाठी शासकीय अनुदान (शॉर्ट मध्ये):

 गायींचा गट (₹1,56,850):
  ▪️ अनुदान: ₹1,17,638 (75%)
  ▪️ स्वहिस्सा: ₹39,212 (25%)

 म्हशींचा गट (₹1,79,258):
  ▪️ अनुदान: ₹1,34,443 (75%)
  ▪️ स्वहिस्सा: ₹44,815 (25%)

 शासन 75% खर्च उचलते, लाभार्थ्याला फक्त 25% भरावा लागतो.

 

अनिवार्य कागदपत्रे (सर्व अर्जदारांसाठी):

 असलेल्या अटींनुसार लागणारी कागदपत्रे:

 अर्जदाराची पात्रता सिद्ध करणारी कागदपत्रे:

 

अधिक माहितीसाठी संपर्क करा:

 पशुधन विकास अधिकारी (विस्तार)पंचायत समिती कार्यालय
  जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी / उपआयुक्तजिल्हा स्तरावरील कार्यालय
  कॉल सेंटर:  1962 (सकाळी 7 वाजता ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत)
  तांत्रिक अडचणीसाठी हेल्पलाइन:  8308584478 (संपर्क वेळ: सकाळी 10 ते संध्याकाळी 6)

 

अर्ज कसा कराल?

 https://ah.mahabms.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या
किंवा
  गुगल प्ले स्टोअर वरून “AH-MAHABMS” मोबाईल अ‍ॅप डाउनलोड करा.

 टॉप मेनूमधील  अर्जदार नोंदणी” या पर्यायावर क्लिक करा.

 आवश्यक माहिती भरून  नोंदणी पूर्ण करा.

 

 

 

Exit mobile version