ऊस हे पीक महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पीक आहे. पश्चिम महाराष्ट्र, अहमदनगर या भागात सर्वात जास्त लागवड करतात. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोकरी मावा (Woolly Aphids) या किडीचा प्रादुर्भाव होतो. उसावर लोकरी मागे होण्यामागे अनेक करणे आहेत जस कि, कमी आर्द्रता किंवा सतत पडणारा पाऊस तसेच उसाची दाट लागवड असल्यास हवा खेळती राहत नाही, यामुळेही माव्याचा प्रादुर्भाव होतो. लोकरी मावा निंफ आणि प्रौढ अवस्थेमध्ये नुकसान करतो. पानाच्या खालच्या बाजूस आढळतात. आणि उसाच्या पानातील रस शोषण करतात. ज्यामुळे पान अशक्त होतात, पिवळी पडतात, उसाची वाढ खुंटते, वाकडी होतात, वजन घटते व उसाचा दर्जा खालावतो. शोषण केल्यावर चिकट द्रव उसाच्या पानांवर टाकतो आणि या द्रवावर बुरशी (Sooty Mould Fungi) तयार होते व यामुळे पानावर काळसर थर तयार होतो. तर आता आपण लोकरी मावा (Woolly Aphids) याच एकात्मिक नियंत्रण कस करायचं ते पाहू,

एकात्मिक नियंत्रण उपाय –
1) उसाचे बेणे निरोगी वापरावं, लोकरी मावा प्रादुर्भावमुक्त असल्याची खात्री करावी.
2) लागवड करण्यापूर्वी बुरशीनाशक प्रक्रिया करणं अत्यंत आवश्यक आहे.
3) उसाची लागवड रुंद सरी पद्धतीने करावी ज्यामुळे फवारणी करणं सोप्प जात.
4) प्रादुर्भाव झालेली पाने तोडून जाळून टाकावीत.
5) नायट्रोजन (नत्र) या खताचा अतिवापर टाळावा.
6) परभक्षी मित्र कीटक – 1 एकर शेतात कोनोबाथ्रा 1000 अंडी आणि क्रायसोपा 1000 अंडी किंवा अळ्या सोडाव्यात.
7) यानंतर 4 आठवड्यापर्यंत कोणत्याच रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करायची नाही.
8) ज्या शेतामध्ये माव्याचा प्रादुर्भाव झाला आहे, तिथून उसाची पाने दुसऱ्या शेतात नेऊ नयेत.
रासायनिक उपाय :
1) क्लोरोपायरीफॉस 20% EC – 1.00 ml ते 1.5 ml प्रति लिटर फवारणी करावी.
किंवा
2) डायमिथोएट (30% EC) – 1.5 ml प्रति लिटर फवारणी करावी.
किंवा
3) असिफेट 75% SP – 1 ते 1.5 gm प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
4) सोबत स्टिकरचा वापर करावा.
लोकरी मावा हा उसासाठी धोकादायक कीड आहे. परंतु, योग्य वेळी उपाय योजना केल्यास त्याचे नुकसान टाळता येते. शेतकऱ्यांनी संतुलित खत व्यवस्थापन, जैविक भक्षकी कीटकांचा वापर आणि गरजेप्रमाणे रासायनिक नियंत्रण हे सर्व उपाय एकत्रितपणे करावेत




Hi, this is a comment.
To get started with moderating, editing, and deleting comments, please visit the Comments screen in the dashboard.
Commenter avatars come from Gravatar.