Friday, October 24, 2025
spot_imgspot_imgspot_img
₹0.00

No products in the cart.

Homeकृषी गुणधर्मघरगुती डॉक्टर कोरफड | कोरफड वापरण्याचे आरोग्यदायी फायदे

घरगुती डॉक्टर कोरफड | कोरफड वापरण्याचे आरोग्यदायी फायदे

कोरफड ही एक बहुगुणी वनस्पति आहे . कोरफड ही आरोग्यासाठी व सौंदर्‍यासाठी तितकीच उपयुक्त आहे . घरच्या घरी सहज लावता येते , आपण आपल्या बागेत किंवा एखाद्या कुंडीत सहजरीत्या कोरफड लाऊ शकतो . प्रत्येक घरात कोरफड ही वनस्पती लावली जाते म्हणून तिला घरगुती डॉक्टर असही म्हणतात . तरुण पिढी कोरफडीचा वापर हा चेहर्‍यावर लावण्यासाठी करतात . परंतु कोरफड केवळ त्वचेसाठी उपयुक्त नाही तर अनेक शरीरातील समस्या दूर करण्यासाठी वापरली जाते

        बाजारात मिळणार्‍या औषधामध्ये किंवा मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणार्‍या क्रीम,तेल,शांपू अशा अनेक प्रकारच्या सौंदर्यप्रसादना मध्ये कोरफडीचा वापर करतात . यात भरपूर प्रमाणात पोषकतत्वे आहेत . व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन B1, B2, B3, B4, व्हिटॅमिन C, फॉलिक अॅसिड, लोह (Iron), कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम याच प्रमाण खूप आहे तसेच कोरफडेमध्ये अँटिऑक्सिडंट, अँटी-इन्फ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल, हायड्रेटिंग आणि डिटॉक्सिफाइंग असे बहुगुणी गुणधर्म आढळतात.

 

कोरफडीच्या सेवनामुळे होणारे फायदे

1) पचन सुधारते –

  कोरफडीमध्ये नैसर्गिकरीत्या enzymes असतात जे अन्नाचे पचन जलद होण्यासाठी मदत करतात . ज्यांना नेहमी पित्त , पोट साफ न होणे , किंवा गॅसेस च त्रास होतो त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी कोरफडीचा रस घेतल्यास पचन क्रिया सुधारते

 

2) रोगप्रतीकारकशक्ति वाढते –

  कोरफडीमध्ये अॅंटीओक्सीडंटस, जीवनसत्व ई यासारखे घटक उपलब्ध असतात , या घटकामुळे शरीरातील पेशींना संरक्षण मिळते आणि हानिकारक फ्री रॅडिकल्स कमी करतात . यामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते .

 

3) मधुमेह नियंत्रण –

      कोरफडीमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते , आणि शरीरातील इंसुलिन नीट काम करते  अस संशोधनात दिसून आल .

 

4) वजन कमी होण्यास मदत होते –

कोरफडीच्या रसामुळे आपल पचन सुधारते आणि त्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते . या कोरफडीच्या रसामुळे मेटाबोलीक रेट वाढून वजन घटते .

 

5) डिटॉक्सिफिकेशन –

 कोरफडीचा रस शरीरातील घाण व टॉक्सिन्स बाहेर टाकून पचन सुधारतो, यकृत व रक्त शुद्ध करतो. तिच्यातील अँटिऑक्सिडंट्स त्वचा निरोगी ठेवतात आणि आजारांची शक्यता कमी करतात

 

त्वचेसाठी कोरफडीचे फायदे

  • कोरफडीचा जेल त्वचेला नैसर्गिक ओलावा देतो, त्यामुळे त्वचा मऊ आणि तजेलदार दिसते.
  • नियमित वापरामुळे पिंपल्स कमी होतात आणि चेहऱ्यावरील डाग हळूहळू फिके होतात.
  • उन्हामुळे होणारी जळजळ, रॅशेस आणि काळेपणा कमी करण्यासाठी कोरफड उपयुक्त आहे.
  • यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स त्वचेला तरुण ठेवतात व सुरकुत्या कमी होण्यास मदत करतात.
  • जखम किंवा भाजल्यावर कोरफडीचा जेल लावल्यास त्वचेला थंडावा मिळतो आणि जखमा लवकर भरतात.
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments