Friday, October 24, 2025
spot_imgspot_imgspot_img
₹0.00

No products in the cart.

Homeपीक लागवड मार्गदर्शनगाजरगवत नियंत्रणासाठी प्रभावी जैविक उपाय – मेक्सिकन भुंगा Zygogramma bicolorata

गाजरगवत नियंत्रणासाठी प्रभावी जैविक उपाय – मेक्सिकन भुंगा Zygogramma bicolorata

शेतामध्ये किंवा शेताच्या बांदावर, एखाद्या पडीक जागेवर किंवा रस्त्याच्या कडेला जिकडे आपली नजर जाते तिथे आपल्याला गाजर गवत दिसते. इंग्रजीमध्ये याला कॉंग्रेस ग्रास आस म्हणतात , या गवताच वैज्ञानिक नाव पार्थेंनियम हिस्टरफोरस आहे . भारतात गाजर गवत अमेरिकेतून 1955 मध्ये आल आणि ते प्रथम महाराष्ट्रातील पुणे येथे आढळल , आणि त्यानंतर ते पूर्ण भारतात झपाट्याने पसरल , हे गवत झपाट्याने वाढण्याच कारण म्हणजे एका गवताच्या झाडामुळे साधारणता 1-1.30 लाखापर्यंत बी तयार होऊ शकते.

   गाजर गवत हे बारामही तण आहे , हे अतिशय वेगानं वाढत त्याला पांढर्‍या रंगाची छोटी-छोटी फुले येतात , शेतकर्‍यांसाठी हे गवत खूपच त्रासदायक आहे , या गवताचा थेट परिणाम पीक उत्पन्नावर होतो ,जनावरांनी चरताना हे गवत खाल्लं की त्यांना विषबाधा होऊ शकते आणि दुधामध्ये कडवडपना ही येतो .

हे गवत शेतामध्ये अत्यंत झपाट्याने पसरते आणि पीक उत्पादनाला मोठा धोका निर्माण करते. मात्र, याचे नियंत्रण खुरपणी करून करणे शक्य नसते, कारण या गवताच्या संपर्काने त्वचेला तीव्र खाज, लालसरपणा आणि चट्टे उठतात आणि रासायनिक तणनाशक परवडत नाही तर शेतातून गाजर गवताचा बंदोबस्त कसा करायचा? हा मोठा प्रश्न शेतकर्‍यांसमोर उभा राहतो .

जैविक प्रतिबंधात्मक योजना

मेक्सिकन भुंगे – झायगोग्रामा बायकोलरटा

Zygogramma Bicolarata हा भुंगा गाजर गवताचा एक प्रभावी व जैविक नियंत्रण साधन आहे. या भुंग्याचा रंग पिवळसर व त्यावर तपकिरी रेषा असतात . त्यांना पानखाऊ भुंगे असेही म्हणतात . हे भुंगे विशेषता कोवळ्या गवताकड आकर्षित होतात आणि पाने , कोवळ खोड अमि फुलांची कळी खातात . सततच्या चाव्यामुळे गवताचे प्रकाशसंश्लेषण कमी होतो व त्यामुळे गवताचा प्रसार व बियांची निर्मिती कमी होते. या भुंग्याचा वापर केल्यामुळे रासायनिक तणनाशकांची गरज मोठ्या प्रमाणात कमी होते आणि विशेष म्हणजे हा भुंगा फक्त पार्थेंनियम वरच त्याचा उपद्रव करतो म्हणजे शेतीतील इतर पिकांना हानी करत नाही त्यामुळे तो पर्यावरणपूरक व मित्रकीटक ठरतो.

जीवनचक्र

Zygogramma bicolorata (पार्थेनियम भुंगा) आपले जीवनचक्र चार टप्प्यांत पूर्ण करतो — अंडे, अळी, कोश आणि प्रौढ भुंगा. मादी भुंगा पानांच्या खालच्या बाजूला अंडी घालते. अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या पानांच्या वरील भाग खातात. अळी अवस्था साधारण १५ दिवसांची असते, तर कोश अवस्था ११ दिवसांची असते. पूर्ण वाढ झाल्यानंतर अळी जमिनीत ३–५ सें.मी. खोलीवर जाऊन कोश अवस्थेत जाते, आणि त्यातून प्रौढ भुंगा तयार होतो. जमिनीतून बाहेर आलेले भुंगे गाजर गवतावर उपजीविका करतात. साधारण जून ते ऑक्टोबर या कालावधीत ते गाजर गवतावर फस्त करतात . नोव्हेंबर महिन्यात हे भुंगे जमिनीत ७–८ महिने विश्रांती घेतात आणि पुढील वर्षी पावसाळ्यात पुन्हा जमिनीतून बाहेर येऊन गवतावर ताव मारतात.

हे भुंगे सोडण्यासाठी प्रथम अधिकृत कृषी केंद्रातून सच्छिद्र पॉलीथीन पिशवीत त्यांना आणावे. प्रती हेक्टरी सुमारे ५०० प्रौढ भुंगे सोडावेत. गाजरगवत कोवळ्या अवस्थेत असताना किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीस सोडल्यास परिणाम अधिक चांगला मिळतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments