कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील असणार नांदणी गाव , येथील सुवस्तिश्री जिनसेन भट्टरक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठामध्ये महादेवी उर्फ माधुरी ही हत्तीण ज्यावेळी ती 4 वर्षाची होती तेव्हापासून येथे राहत होती म्हणजेच 1992 पासून 2025 पर्यंत अर्थात 34 वर्षापासून. ‘महादेवी’ ही धार्मिक सोहळ्यांसाठी वापरली जात होती आणि ग्रामीण भागातील भाविकांसाठी श्रद्धेचा विषय होती. पण PETA इंडिया ने तिच्या आरोग्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली त्याच्या तक्रारीनंतर आणि मागणींनुसार तिला ‘वनतारा अभयारण्य जामनगर (गुजरात) येथे पाठवण्यात आल
नांदणी मठ हा ७४८ गावांचा केंद्रबिंदू मानला जातो. इथे अनेक दशकांपासून हत्ती पाळण्याची परंपरा आहे. या मठातील हत्ती केवळ धार्मिक विधींमध्ये सहभागी नसून, तो स्थानिक श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक एकतेचे प्रतीक मानला जातो. महादेवी हत्तीणही याच परंपरेचा एक अविभाज्य भाग होती.
PETA India चे तज्ज्ञ, फॉरेन्सिक पशुवैद्यकीय अधिकारी आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने नियुक्त केलेल्या समितीच्या निरीक्षणात काय होत?
निरीक्षणानुसार, तिच्या आरोग्याच्या स्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. समितीच्या तपासणीत हत्तीणीला आर्थराइटिस (संधिवात), फूट रॉट (पायांतील कुजलेला संसर्ग), शरीरावर व्रण (जखमा), अनियंत्रितपणे वाढलेली नखे, मठामध्ये तिच्या योग्य देखभालीसाठी आवश्यक सुविधा नव्हत्या, आणि मानसिक तणाव अशी अनेक समस्या असल्याचे स्पष्ट झाले. मानसिक लक्षणांमध्ये वारंवार डोकं हलवणं, एका जागी ताटकळत राहणं, आणि आक्रस्ताळं वर्तन अशा त्रासदायक गोष्टींचा समावेश होता. या स्थितीत तिचे मठात राहणे तिच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यास अपायकारक ठरू शकते, असा निष्कर्ष समितीने नोंदवला. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने तिच्या पुनर्वसनाचा आदेश देत, हत्तीणीला गुजरातमधील जामनगर येथील ‘वनतारा’ या अभयारण्यात हलवण्याचे निर्देश दिले.

भावनांनी ओथंबलेला निरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, महादेवी हत्तीणीला जामनगर (गुजरात) येथील वनतारा अभयारण्यात हलवण्याचा निर्णय झाला. त्यासाठी खास प्राणी अॅम्ब्युलन्स मठात दाखल झाली. ही बातमी गावभर वाऱ्यासारखी पसरली — “महादेवी आता मठ सोडून जाणार आहे.”
हे कळताच आजूबाजूच्या गावांतून लोक मोठ्या संख्येने मठात जमले. महादेवीला फुलांनी सजवण्यात आलं. गावाच्या मुख्य रस्त्यावरून तिची मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी तिचं औक्षण केलं, फुलांची उधळण केली आणि तिची पूजा केली.
त्या क्षणी तिथं उपस्थित प्रत्येकजण भावुक झाला. महादेवीच्याही डोळ्यांत पाणी होतं, तर सुवस्तिश्री जिनसेन भट्टरक पट्टाचार्य महास्वामी यांच्या डोळ्यांतूनही अश्रू वाहत होते.



