आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (Ayushman Bharat Yojana) : केंद्र शासनाकडून आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबासाठी अनेक योजना राबवत असते. त्यापैकीच हि एक महत्वाची योजना आहे. आयुष्मान कार्ड हि भारत सरकारची एक आरोग्य संरक्षण योजना आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत उपचारांचा लाभ दिला जाते. यामध्ये देशातील कोट्यवधी लोक लाभ घेत आहेत. या योजनेमार्फत लाभार्थ्याला 15 लाखांपर्यंतचे मोफत उपचार दिले जातात. हि योजना केंद्र सरकारने 2018 साली सुरु केली आहे.आयुष्मान भारत हि सर्वात मोठी योजना आहे.
उद्दिष्टे –
1) आयुष्मान भारत हि योजना आरोग्यसेवा थेट गावपातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. ता योजनेचा उद्देश प्राथमिक मध्न्यम आणि गंभीर उपचाराची सुविधा एकाच व्यवस्थेत उपलब्ध करून देणे हा आहे. यामध्ये आजार होऊ देऊ नये यासाठी प्रतिबंध, आजार ओळखण्यासाठी तपासणी आणि आजार झाल्यावर उपचार व काळजी या सर्व गोष्टींचा समावेश आहे. त्यामुळे नागरिकांना सहज आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यास मदत होते.
2) आयुष्मान योजनेचा मुख्य उद्देश गरीब व गरजू कुटुंबाना परवडणारी आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा आहे.
गोल्डन कार्ड म्हणजे काय ?
या योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना सरकारकडून आयुष्मान गोल्डन कार्ड दिले जाते. या कार्डासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो. या योजनेअंतर्गत गोल्डन कार्ड मार्फत पात्र नागरिकांना 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतो.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया – आयुष्मान भारत गोल्डन कार्ड
- अधिकृत वेबसाइट mera.pmjay.gov.in वर लॉगिन करा
- तुमचा मोबाईल नंबर टाका आणि आलेला OTP भरा
- स्क्रीनवर तुमचे राज्य निवडा
- पात्रता तपासण्यासाठी मोबाईल नंबर / नाव / रेशन कार्ड नंबर / RSBY URN पैकी एक माहिती भरा
- यादीत नाव आढळल्यास तुम्ही योजनेसाठी पात्र आहात
- आवश्यक माहिती तपासून अर्ज सबमिट करा

- तुमचा अलीकडील फोटो अपलोड करा
- अर्ज सबमिट केल्यानंतर काही वेळाने पुन्हा लॉगिन करून कार्डची स्थिती तपासा
- आयुष्मान गोल्डन कार्ड तयार झाल्यावर ते डाउनलोड करता येते
- या कार्डच्या माध्यमातून ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेता येतात
किंवा
- जर ऑनलाइन प्रक्रिया कठीण वाटत असेल, तर जवळच्या CSC (जनसेवा केंद्र) किंवा आयुष्मान मित्र केंद्रावर जाऊनही अर्ज करा.
जर आयुष्मान कार्ड तयार झाले असेल, तर ते ऑनलाइन डाउनलोड करता येते. या कार्डच्या मदतीने योजनेअंतर्गत दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार घेता येतात. तसेच देशभरातील नोंदणीकृत सरकारी व खासगी रुग्णालयांत या योजनेचा लाभ मिळतो.
हे ही वाचा : उमेद महिला बचत गटामुळे लाखो ग्रामीण महिला स्वावलंबी; अनेक ‘लखपतीदीदी’ बनल्या.
BALWAAN Krishi BS-21 बॅटरी व मॅन्युअल 2-in-1 नॅपसॅक स्प्रेयर (12V x 8Ah), 18 लिटर टाकी क्षमतेसह उच्च दाबाने फवारणीसाठी उपयुक्त – आजच खरेदी करा.


