Friday, January 16, 2026
spot_imgspot_imgspot_img
₹0.00

No products in the cart.

Homeरोजच्या घडामोडीरेशन कार्डधारकांसाठी मोठी अपडेट: जानेवारीपासून कुणाला किती धान्य मिळणार?

रेशन कार्डधारकांसाठी मोठी अपडेट: जानेवारीपासून कुणाला किती धान्य मिळणार?

नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे. मागील काही महिन्यांपासून अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजना अंतर्गत धान्य वितरणाच्या पद्धतीत बदल करण्यात आले आहेत. अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना यापूर्वी प्रत्येकी 5 किलो गहू, पाच किलो ज्वारी आणि उर्वरित तांदूळ असं एकूण 25 किलो धान्य दिले जात होते.

मात्र प्राधान्य कुटुंब योजनेतील कार्डधारकांसाठी आधी मिळणाऱ्या दोन किलो गहू आणि तीन किलो तांदळाच्या ऐवजी आता एक किलो गहू आणि एक किलो ज्वारी देण्यात येऊ लागली आहे. आणि या बदलामुळे अनेक लाभार्थ्यांना पहिल्यांदाच रेशन दुकानातून ज्वारी मिळाल्याचा अनुभव आला असून, धान्य वितरणात झालेल्या या बदलांची सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा होत होती. पण काही भागांत ज्वारीच्या वापर संदर्भात अडचणी आल्याने हा प्रयोग थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जानेवारीपासून रेशन दुकानांवर ज्वारीचा पुरवठा बंद होणार असून लाभार्थ्यांना पुन्हा केवळ गहू आणि तांदूळच दिला जाणार आहे.

१ जानेवारीपासून किती धान्य मिळणार?

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत ठरवलेल्या नियमांनुसार जानेवारी २०२६ पासून धान्यवाटप सुरू राहणार आहे. पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या योजनेनुसार दरमहा ठराविक प्रमाणात धान्य दिले जाईल.

अंत्योदय अन्न योजना (AAY)

अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांना दरमहा एकूण ३५ किलो धान्य दिले जाईल.
यामध्ये:

  • २१ किलो गहू
  • १४ किलो तांदूळ
    असा समावेश असेल.

रेशन कार्डधारकांसाठी मोठी अपडेट

प्राधान्य कुटुंब योजना (PHH)

प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती दरमहा:

  • ३ किलो गहू
  • २ किलो तांदूळ
    मिळणार आहे.

या नियमानुसार पात्र नागरिकांना कोणताही बदल न होता नियोजित धान्याचा लाभ मिळत राहणार आहे.

ज्वारी प्रयोग थांबला, रेशन व्यवस्था पूर्वपदावर

ज्वारीचा प्रयोग थांबवण्याचा निर्णय घेतल्यानंतर रेशन वितरण व्यवस्था पुन्हा पारंपरिक आणि सोप्या पद्धतीने सुरू होणार आहे. मागील काही महिन्यांत गहू, तांदूळ आणि ज्वारी असे मिश्र धान्य दिले जात होते, अनेक लाभार्थ्यांना अडचणी येत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ज्वारीचा पुरवठा बंद करून पुन्हा गहू आणि तांदूळ वितरणावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच लाभार्थ्यांचा संभ्रम कमी होऊन रेशन व्यवस्थेत नव्या वर्षात स्थैर्य येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा : साखर उद्योग प्रोत्साहन योजना | साखर कारखान्यांसाठी महाराष्ट्र शासनाचा निर्णय

आता खरेदी करा : BALWAAN Krishi BS-21 2-in-1 Knapsack Sprayer (Battery + Manual) – 12V x 8A, 18L टँक, High Pressure Sprayer

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments