aadhunikshetitantra.com

पावसानं जमीन खरडली? सरकारकडून मोफत माती-गाळ; शेतकऱ्यांना दिलासा

पूरग्रस्त जमीन , पावसानं जमीन खरडली मोफत माती गाळ

यंदाच्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पावसानं जमीन खरडली , मोफत माती गाळ या मदतीची गरज निर्माण झाली आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे यंदा राज्यातील अनेक भागांमध्ये शेतीला मोठा फटका बसला आहे.अनेक ठिकाणी पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे शेतजमिनीची वरची सुपीक माती वाहून गेली, ढगफुटी आणि भूस्खलनामुळे शेतीची सुपीकता नष्ट झाली. अशा या कठीण परिस्थितीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.या उपक्रमांतर्गत शेतजमिनी दुरुस्तीसाठी आवश्यक असलेली माती, गाळ,मुरूम आणि कंकर आता सरकार मार्फत पूर्णपणे शुक्ल मदत देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

राज्य सरकारचा मोठा निर्णय –

राज्यामध्ये ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे जीवितहानी त्याचबरोबर पिकांचे आणि जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या, जमिनीला खड्डे पडले आहेत.यामुळे शेतजमिनीच्या दुरुस्तीसाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलाय.

हे ही वाचा – नवीन विहीर ,विहीर दुरुस्ती अनुदान योजना: पात्रता, अर्ज प्रक्रिया व कागदपत्रे

Exit mobile version