शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीसाठी मोठं अनुदान जाहीर

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीसाठी मोठं अनुदान जाहीर

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. आता औषधी व सुगंधी वनस्पतींच्या लागवडीसाठी पुन्हा एकदा अनुदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पारंपरिक शेतीपेक्षा वेगळा पर्याय शोधणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे. याआधी २०१५ ते २०२० दरम्यान ही योजना यशस्वीपणे राबवली गेली होती, आणि त्या काळात ८१८ हेक्टर क्षेत्रावर लागवड होऊन चार कोटी रुपयांहून अधिक अनुदान वितरित करण्यात आले होते. मात्र, काही कारणांमुळे २०२१ नंतर योजना बंद करण्यात आली होती. आता ही योजना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत पुन्हा सुरू करण्यात आली असून, राज्यातील शेतीला नवा दिशा देण्याची क्षमता या योजनेत आहे.

शेतकरी आता अनुदानाच्या मदतीने ज्येष्ठमध, शतावरी, कालीहारी, ब्राम्ही, तुलसी , कुटकी, अतिस, जटामासी, अश्वगंधा, , विदारीकंद, सफेद मुसळी, गुग्गूळ, मंजिष्ठा ,पिंपळी, चिराटा आणि पुष्करमूळ यांसारख्या औषधी वनस्पतींची लागवड करू शकतात. या पिकांसाठी शासनाने प्रतिहेक्टर सुमारे दीड लाख रुपयांचा खर्च गृहीत धरला आहे. यावर आधारित, सर्वसामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत लागवडीसाठी ४० टक्के अनुदान मिळणार आहे.

अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत ५० टक्के अनुदानाचा लाभ मिळणार आहे. गुलाब, रोझमेरी, , कॅमोमाईल, चंदन, दवणा, निशिगंध, जिरेनियम ,जाई, लॅव्हेंडर यांसारख्या उच्च बाजारमूल्य असलेल्या सुगंधी वनस्पतींच्या लागवडीसाठीही हे अनुदान उपलब्ध आहे. या पिकांसाठी सव्वा लाख रुपये प्रतिहेक्टर लागवड खर्च गृहीत धरला असून, सर्वसामान्य शेतकऱ्यांना ४० टक्के आणि अधिसूचित भागातील शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे., तुळस, व्हेटिव्हर, पामरोसा, गवती चहा ,जावा, सिट्रोनेला आणि गोड तुळशीपत्र यांसारख्या सुगंधी वनस्पतींची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना ४० टक्के अनुदान दिले जाईल. यासाठी प्रतिहेक्टर लागवड खर्च ५० हजार रुपये धरून योजना तयार करण्यात आली आहे. त्यामुळे या वनस्पतींच्या शेतीत रुची असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे.

शेतकऱ्यांनी जर या योजनेतून कोणत्याही औषधी किंवा सुगंधी वनस्पतीची लागवड करून अनुदान घ्यायचे असेल, तर त्यांना महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ mahadbtmahait.gov.in वर जाऊन अर्ज करावा लागेल, असे मंडळाने सांगितले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *