अपराजिता (Clitoria ternatea)फुलापासून बनते Blue Tea – खूप उपयोगी!

अपराजिता (Clitoria ternatea)फुलापासून बनते Blue Tea – खूप उपयोगी!

तुम्हाला जर एकाच गोष्टीत मानसिक शांतता, पचन सुधारणा, वजन नियंत्रण आणि इम्युनिटी वाढ यांचा संगम हवा असेल, तर Blue Tea हे तुमच्यासाठी उत्तम नैसर्गिक समाधान आहे. अपराजिता फुलाचे उपयोग आता आयुर्वेदातच नाही तर जागतिक संशोधनातही सिद्ध झाले आहेत! शुद्ध निळसर रंगाचे, सौंदर्य आणि औषधी गुणांनी भरलेले अपराजिता फुल (Clitoria ternatea) म्हणजे निसर्गाने दिलेले अनमोल वरदान आहे. आयुर्वेदात त्याचा उल्लेख ‘शंखपुष्पी’ म्हणून केला जातो आणि आजच्या काळात याच फुलातून तयार होणारी ब्लू टी (Blue Tea) संपूर्ण जगभर प्रसिद्ध झाली आहे. चला तर पाहूया अपराजिता फुलाचे आश्चर्यकारक फायदे…

१. नैसर्गिक डिटॉक्सिफायर – शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतो

अपराजिता फुलाची चहा पिणे म्हणजे शरीराला एक नैसर्गिक डिटॉक्स देणे. हे फुल मूत्रवर्धक आहे, त्यामुळे किडनी आणि लिव्हर यांचे कार्य सुधारते. शरीरातील घातक घटक बाहेर टाकण्यास मदत होते.


 २. स्मरणशक्ती वाढवतो – मेंदूसाठी वरदान

आयुर्वेदानुसार हे फुल मेंदूचे आरोग्य सुधारते. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी आणि मानसिक ताणात असलेल्या व्यक्तींसाठी शंखपुष्पी सारखीच ही फुलं अत्यंत उपयुक्त मानली जातात.


 ३. डोळ्यांसाठी फायदेशीर

यामध्ये अँथोसायनिन्स (Anthocyanins) नावाचे पिग्मेंट असते जे डोळ्यांच्या दृष्टीसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. यामुळे डोळ्यांतील सूज, लालसरपणा आणि थकवा दूर होतो.


 ४. प्रतिकारशक्ती वाढवतो

या फुलांमध्ये अँटीऑक्सिडंट्स, फ्लाव्होनॉइड्स व अँटी-इन्फ्लेमेटरी घटक मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दी, खोकला, ताप यापासून नैसर्गिक संरक्षण मिळते.


 ५. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

ब्लू टी रोज प्यायल्यास मेटाबॉलिझम वाढतो, फॅट बर्न होतो आणि वजन नियंत्रित राहते. डायट करणाऱ्यांसाठी हा चहा एक उत्तम पर्याय आहे.


 ६. त्वचेचा नैसर्गिक ग्लो

या फुलात असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेतील हानीकारक घटक नष्ट करतात. ब्लू टीचा नियमित वापर त्वचेला तजेलदार, स्वच्छ आणि तरतरीत ठेवतो.


 ७. केसांच्या आरोग्यासाठी वरदान

अपराजिता फुलाचा अर्क केसांना मजबूत करतो, गळती कमी करतो आणि नैसर्गिक काळसरपणा टिकवतो. हे अनेक हर्बल हेअर ऑइल्समध्ये वापरले जाते.


 ८. नैसर्गिक रंग तयार करतो

हे फुल नैसर्गिक निळा रंग तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे ते फूड इंडस्ट्रीमध्ये, सौंदर्यप्रसाधनांमध्ये आणि हस्तकलेतही वापरले जाते.


 ९. मानसिक शांतता व झोप सुधारते

ब्लू टीमध्ये no caffeine असते, त्यामुळे ती दवाखाना झोप आणि मानसिक शांतता मिळवण्यासाठी उत्कृष्ट आहे.

अपराजिता फुलाची लागवड भारतात मुख्यतः महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये केली जाते.
महाराष्ट्रात विशेषतः नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, पुणे, बीड, सांगली आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये काही प्रगतशील शेतकरी याची व्यावसायिक लागवड करत आहेत.

या भागात हवामान उष्ण व कोरडे असल्याने आणि औषधी वनस्पतींबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढल्यामुळे ही लागवड चांगल्या प्रकारे यशस्वी होते.

·  ब्लू टी फुलांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जबरदस्त मागणी आहे, विशेषतः USA, युरोप, जपान आणि दुबई येथे ही औषधी फुले निर्यात केली जातात.

·  भारतातसुद्धा ऑर्गेनिक उत्पादन, आयुर्वेदिक कंपन्या, हर्बल टी उत्पादक, कॉस्मेटिक ब्रँड्स यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

·  ऑनलाइन मार्केटप्लेस (Amazon, Flipkart, Etsy) यावर सुकवलेली फुले ₹400 ते ₹1000 प्रति किलो दराने विकली जात आहेत.

·  काही कंपन्या शेतकऱ्यांशी करारशेती (contract farming) करत आहेत आणि सुकवलेल्या फुलांना थेट खरेदी करतात.

·  मार्केटमध्ये सध्या स्पर्धा कमी आहे पण मागणी वेगाने वाढत आहे, त्यामुळे हे पीक भविष्यात अत्यंत फायदेशीर ठरू शकते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *