भोपळ्याच्या बिया – आपण घरी भोपळा शिजवताना किंवा खाल्यानंतर त्याच्या बिया टाकून देतो , पण जितके भोपाळ्याचे फळ उपयोगी आहे . त्याहून ही त्याच्या बियाही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत . भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक, मॅग्नेशियम, आयर्न ,अॅंटीआक्सिडेंट, विटमिन ए, विटमिन ई , विटमिन सी , फास्फोरस , फायबर यासारखे पोषकतत्वे आहेत. भोपळ्याच्या बियाचे नियमितपणे सेवन केल्यामुळे पचनशक्ती , रोगप्रतिकारकशक्ती , हृदयाच आरोग्य सुधारते .
फायदे –
1) भोपाळ्याच्या बिया मधुमेह रुग्णासाठी खूप गुणकारी असतात कारण भोपाळ्याच्या बियामध्ये मॅग्नीशियम असते , आणि ते इंसुलिनचे काम सुधारून रक्तातील साखर नियंत्रित करते .
2) भोपाळ्याच्या बियामध्ये वजन कमी होण्यास मदत होते कारण भोपाळ्याच्या बियांमध्ये हेल्दी फॅट्स असतात त्यामुळे मेटबोलीझम सुधारते आणि चरबी जाळण्याच्या प्रक्रियेत मदत करते . तसेच यामध्ये फायबर आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असल्यामुळे पोत जास्त वेळ भरल्यासारखं वाटत व जास्त भूक लागत नाही
3) या बियांमध्ये भरपूर प्रमाणात करोटीनोइड्स आणि विटमीन ई यासारखे अॅंटीओक्सीडंट्स असतात यामुळे आपल्या शरीरात कुठेतरी सूज वगेरे असेल तर ती सूज कमी करते . तसेच यामुळे हृदयाच आरोग्य सुधारते आणि यामध्ये अॅंटीकॅन्सर सारखे गुणधर्म देखील आहेत
4) भोपळ्याच्या बियामध्ये प्रोटीन(प्रथिने) चांगल्या प्रमाणात असतात तर प्रथिनामुळे शरीरातील पेशी व ऊतकांची दुरूस्ती करते व त्यांना ताजेतवाने ठेवते . यामुळे वृध्द्त्त्वाची (aging) प्रक्रिया मंदावते आणि यामुळे आपल शरीर निरोगी ही राहत
5) या बियाण्यामध्ये झिंक असल्यामुळे आपली रोगप्रतिकारकशक्ति (Immune system) मजबूत राहते . आणि छोट्या छोट्या सर्दी , खोकला , ताप व व्हायरल सारख्या आजारापासून संरक्षण मिळते
6) या बियामध्ये मुबलक प्रमाणात मॅग्नेशियम, फोस्पोरस आणि झिंक असते . यामुळे आपली हाडे मजबूत राहतात .
7) भोपाळ्याच्या बिया फायबरयुक्त असतात जे पचनसंस्था सुधारतात आणि बध्दकोष्ठता टाळतात
8) भोपाळ्याच्या बिया पुरुषांसाठी प्रोस्टेट आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत . झिंक, फायबर यामुळे सूज कमी होते , लघवीसंबधी त्रास सुधारतो
भोपळ्याच्या बिया आहारात सामावून कशा घ्यायच्या ?
- कच्च्या स्वरूपात – नाश्त्यात किंवा मधल्या वेळच्या खाण्यात थेट खाऊ शकता.
- भाजून – हलक्या आचेवर भाजून कुरकुरीत स्नॅक म्हणून खाता येतात.
- स्मूदी/मिल्कशेकमध्ये – पावडर करून शेक किंवा स्मूदीत मिसळा.
- सलाड/सूपमध्ये – टॉपिंग म्हणून वापरल्यास चव व पौष्टिकता वाढते.
- भाकरी/पराठा/लाडूमध्ये – कूट करून पीठात मिसळल्यास आहार अधिक आरोग्यदायी होतो.
भोपळ्याच्या बिया सकाळी आणि रात्री दोन्ही वेळा खाल्ल्यास फायदेशीर ठरतात. सकाळी खाल्ल्यास शरीराला दिवसभरासाठी ऊर्जा मिळते, पचन चांगले राहते आणि भूक नियंत्रित राहते, त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. रात्री खाल्ल्यास त्यातील ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो ॲसिड शरीरात सेरोटोनिन आणि मेलॅटोनीन तयार करण्यात मदत करते, ज्यामुळे मन शांत होते, झोप चांगली लागते आणि स्नायूंची दुरुस्तीही होते.
