महाराष्ट्रामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. सर्वात जास्त नुकसान मराठवाडा, सोलापूर, धाराशिव या भागांत झालेला आहे. शेतकऱ्याने एवढ्या कष्टाने कसलेल्या शेतामध्ये कुठे कापसाचे बोन्डे चिखलात सडत आहेत तर कुठे सोयाबीनचं शेत पूर्ण पाण्याखाली गेली आहेत.
या सर्व परिस्थितींचा आढावा घेऊन मंत्री मंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांसाठी 2 हजार 215 कोटी निधी मंजूर केला आहे. मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि यामध्ये त्यांनी सांगितले कि, अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी मंजूर केला आहे. यामध्ये आत्तापर्यंत 1829 कोटी रुपये रक्कम वाटप झाल्याचं सांगितलं. येत्या 10-12 दिवसांमध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात टप्या – टप्याने हि रक्कम जमा होईल. राज्यातील अतिवृष्टीग्रस्त 20 जिल्यांसाठी 1339 कोटी मंजूर केला आहे. यामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ व अमरावती या विभागासाठी राज्य सरकारने 565 कोटी 60 लाख 30 हजार रुपये इतका निधी मंजूर केला आहे.

अमरावती विभागामध्ये 7 लाख 88 हजार 974 शेतकरी अतिवृष्टीग्रस्त आहेत. यानंतर नागपूर विभागामध्ये गोंदिया, नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा या जिल्यांसाठी 23 कोटी 86 लाख 26 हजार रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे. या विभागात 37 हजार 631 शेतकरी बाधित होते. तर पुणे विभागातील कोल्हापूर जिच्यासाठी 14 कोटी 28 लाख 52 हजार रुपयांचा निधी 36 हजार 559 शेतकऱ्यांसाठी मंजूर केला गेला आहे. आणि छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली या जिच्यासाठी 721 कोटी 97 लाख 86 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या विभागामध्ये 10 लाख 35 हजार 68 शेतकरी बाधित झाले आहेत. यानंतर नाशिक विभागामध्ये नाशिक, अहिल्यानगर, नंदुरबार, जळगाव, धुळे, या जिल्यांसाठी 13 कोटी 77 लाख 31 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. बाधित शेतकरी 24 हजार 677 इतके आहेत.
येत्या 10-12 दिवसांमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हि रक्कम जमा होईल असं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत.
तुमच्या भागामध्ये मदत मिळाली का,आम्हाला नक्की सांगा



