भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना : ही योजना 2018 पासून राबविण्यात येते , ज्या शेतकर्यांना आपल्या शेतात फळबाग शेती सुरू करायची आहे पण त्यांच्याकड अर्थसाहाय्य नाहीय तर ते शेतकरी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घेऊ शकतात , विशेषता 100 % अनुदान ही या योजनेची सर्वात मोठी बाजू आहे . या योजनेच्या माध्यमातून पीक व पशुधन याबरोबर च फळबागेच्या रूपाने शेतकर्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध व्हावा
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना – लाभार्थी पात्रता
l फक्त वैयक्तिक शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.
7/12 उताऱ्यावर शेतकऱ्याचं स्वतःचं नाव असणं आवश्यक आहे.
l
संयुक्त खातेदारी असल्यास सर्व खातेदारांची संमती आवश्यक आहे.
l
कूळ जमिनीवर फळबाग लागवड करताना कूळदाराची संमती आवश्यक आहे.
l
शेतीवर संपूर्णपणे अवलंबून असलेल्या कुटुंबांना प्रथम प्राधान्य दिलं जातं.
l
अनुसूचित जाती-जमाती, महिला, दिव्यांग, अल्प/अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य आहे.
वन हक्क कायद्यानुसार वनपट्टा धारक शेतकरी पात्र आहेत.
l
MGNREGA लाभार्थ्यांना थेट अनुदान दिलं जात नाही, परंतु काही अटींवर निवड होऊ शकते.
योजनेत मिळणारा लाभ
फळबाग लागवडीसाठी 100% अनुदान दिले जाते.
हा लाभ 3 वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने दिला जातो.
अनुदानात खालील बाबींचा समावेश होतो:
खड्डे खोदणे
कलमे/रोपे लागवड
पीक संरक्षण
नांग्या भरणे
रासायनिक व सेंद्रिय खते
लाभार्थी निवड प्रक्रिया
इच्छुक शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टल वर अर्ज करावा.
पोर्टलवर नोंदणी व आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे.
अर्ज सादर केल्यानंतर सोडत (लॉटरी) पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाते.
निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांना मोबाईलवर SMS द्वारे सूचना पाठवली जाते.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत मान्य असलेली फळपिके ही विशेषतः बहुवार्षिक (दीर्घकाळ उत्पादन देणारी) असून, एकूण १६ फळपिकांचा यामध्ये समावेश आहे. या योजनेत शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार कलमे किंवा रोपाद्वारे लागवड करण्याची परवानगी आहे. या पिकांमध्ये आंबा, काजू, पेरू, चिक्कू, डाळिंब, सिताफळ, कागदी लिंबू, नारळ, चिंच, अंजीर, आवळा, कोकम, फणस, जांभूळ, संत्रा आणि मोसंबी यांचा समावेश आहे. यापैकी काही पिकांसाठी विशेष लागवड तंत्र स्वीकारण्यात आले आहे.
लागवडीसंदर्भातील विशेष मार्गदर्शक सूचना:
आंबा व पेरू या फळपिकांसाठी घनलागवडीस (High Density Planting) परवानगी आहे.
संत्रा फळपिकासाठी इंडो-इस्त्राईल तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक लागवड पद्धत वापरण्यास मान्यता आहे.
लागवड कलम किंवा रोपांद्वारे करण्यास मान्यता दिली जाते (शासन मान्यतेनुसार व आवश्यकतेनुसार).



