श्रीलंका हा देश भारताचा खरेदीदार देश मानला जातो , परंतु आजपासून श्रीलंका देशाने आयात शूल्कात मोठा बदल केला आहे . आजपासून कांद्याचे आयात शुल्क 10 रु प्रतिकिलोवरून 50 रु प्रतिकिलो आणि बटाटा आयात शुल्क 60 रु प्रतिकिलो वरुन 80 रु प्रतीकिलो इतका केला आहे , म्हणजे आयात शूल्कात जवळजवळ पाचपट वाढवण्यात आले आहेत , या निर्णयामुळे भारतीय निर्यातदार आणि शेतकर्यांना फटका बसला आहे , यामुळे कांदा व बटाटा दोन्ही प्रकारचा माल पोहचिवणे भारतीय शेतकर्यांना परवडणार नाही
आयात शुल्क वाढवण्याच कारण
हा निर्णय ऑगस्ट 2025 च्या शेवटी लागू झाला आहे , तर आयात शुल्क वाढवण्याच कारण अस की , यंदा श्रीलंकेतल्या स्थानिक शेतकर्यांनी कांद्याच चांगलं उत्पादन घेतलं आहे , त्यामुळे श्रीलंकेच्या बाजारात स्थानिक कांद्याचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे , याच पार्श्वभूमीवर , जर भारतातील कांदे श्रीलंकेत निर्यात झाले तर श्रीलंकेतील स्थानिक शेतकर्यांचा मोठा तोटा होईल , त्यामुळे च श्रीलंका सरकार ने कांदा व बटाटा चे आयात शुल्क वाढवले आहेत . अस निर्यातदारांकडून ऐकायला मिळत आहे .
भारतीय शेतकर्यांवर परिणाम :
भारत देशामध्ये सर्वात जास्त कांदा निर्यात करण्यात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे , या मध्ये पुणे , नाशिक , लासलगाव , मनमाड हे भाग विशेष प्रसिद्ध आहेत . भारतातून श्रीलंका देशाला मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होत असे . मात्र आता एका किलो मागे 10रु ऐवजी 40रु वाढल्याने भारतातून निर्यात होणारा कांदा श्रीलंकेला महाग पडेल व त्यामुळे तेथील व्यापारी आयात कमी करतील आणि या कारणामुळे निर्यात कमी झाली की भारतातच कांद्याचा साठा वाढेल
तसेच श्रीलंकेकडून मागणी कमी झाली की भारतातील बाजारात कांद्याचा पुरवठा जास्त होईल व कांद्याचे दर घसरतील यामुळे कांद्याच्या दरात चढ – उतार होऊ शकतो . आणि शेतकर्यांना स्थानिक बाजारांवर अवलंबून राहावं लागेल याचा थेट परिणाम म्हणजे शेतकर्यांना साठवणुकीचा खर्च अतिरिक्त खर्च येतो.
श्रीलंकेचा आयात शुल्क आता जास्त असल्यामुळे निर्यातदारांना पर्यायी बाजारपेठेचा शोध घ्यावा लागेल . या सर्व गोष्टीमुळे शेतकर्यांसामोर एक नवीन आव्हान उभे राहिले आहे
