गेल्याच काही दिवसात पंतप्रधान किसान सन्मान निधिचे 2000 रु आल्यानंतर आज शेतकर्यांच्या खात्यात पंतप्रधान फसल (पीक) विमा योजना अंतर्गत चे आणखी पैसे जमा होणार आहेत .
राजस्थान येथील झुंझूनू येथे कार्यक्रमादरम्यान 2022 पासून ते 2025 पर्यत थकीत रक्कम शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे . ही रक्कम 3200 कोटी असून 30 लाखांहून अधिक शेतकर्यांच्या खात्यात जमा होणार आहेत असे शिवराज चौहाण यांच्याकडून ट्विट करण्यात आल या कार्यक्रमाला राजस्थानचे माननीय मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात पोहोचविण्याची प्रक्रिया सुरू होईल.
हा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट डीबीटीद्वारे जमा केला जाणार आहे. ३२०० कोटी रुपयांचा हा पहिला हप्ता असून, पुढील ८००० कोटी रुपयांची रक्कम नंतरच्या टप्प्यात वितरित केली जाणार आहे.
विमा कंपन्याना सुचना
सोमवारी दिनांक 11 ल थेट रक्कम शेतकर्यांच्या खात्यात जमा केली गेली पाहिजे , अशी सुचना पीक विमा कंपन्याना केंद्रीय कृषि मंत्री शिवराज चौहाण यांनी केली आहे. कृषिमंत्र्यानी हे स्पष्ट केले की , जर पीक विमा कंपन्यांनी ठरलेल्या मुदतीत नुकसान ग्रस्त शेतकर्यांना भरपाई दिली नाही तर , त्यांच्याकडून 12% व्याजासह दंड आकाराला जाईल . हे व्याज थेट शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे . सोमवारी सर्व शेतकर्यांच्या खात्यात थेट पैसे गेले पाहिजेत यामध्ये कुठलीच अडचण येऊ नये अशी सूचना दिली आहे . कारण या आधी पीक विमा कंपन्यांनी राज्य सरकार न अनेकदा सूचना देऊन ही शेतकर्यांना पीक विमाची भरपाई दिलेली नाही . यामध्ये शेतकर्यांची संभ्रमित अवस्था होती की हप्त्याची रक्कम राज्य सरकार न दिलीय की नाही .
प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY)
प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) ही शेतकऱ्यांना शेतीदरम्यान येणार्या नैसर्गिक आपत्तींपासून आर्थिक संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने राबविलेली ही एक महत्वाची योजना आहे.या योजनेमध्ये अवकाळी पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, गारपीट, वादळ, तसेच कीड व रोग यांसारख्या कारणांमुळे पिकांचे होणारे नुकसान यात समाविष्ट आहे. पिकांचे नुकसान झाल्यास, संबंधित अधिकाऱ्यांकडून तपासणी म्हणजेच पंचनामे आणि तपासणी अहवाल तयार केला जातो. या अहवालाच्या आधारे विमा कंपनी शेतकऱ्यांना ठरलेली भरपाई थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करते. रक्कम थेट खात्यात जमा होते. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळतो आणि शेतकर्याचे उत्पन्न स्थिर राहत



