aadhunikshetitantra.com

ग्रामशेती पर्यटन (Agro tourism) : शेती आणि संस्कृतीचा संगम घडवणारा नवा पर्याय

ग्रामशेती पर्यटन (Agro tourism) : शेती आणि संस्कृतीचा संगम घडवणारा नवा पर्याय

शहरी जीवनापासून दूर जाऊन, निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी सर्वांनाच आवडत. आणि लोकांना हि कल्पना पण खूप आवडायला लागलीय. ती म्हणजे ‘ग्रामशेती पर्यटन’. ग्रामशेती पर्यटनाचा वाढत कल पाहायला मिळत आहे. हि एक शेती आणि पर्यटनाचा सुंदर अनुभव आहे.

 

शहरी जीवनातील धावपळ, ताणतणाव, आणि प्रदूषणाने भरलेल्या वातावरणामध्ये शहरातील नागरिक निसर्गाच्या कुशीत वेळ घालवण्याची इच्छा व त्यांचे अनुभव व्यक्त करू लागले आहेत. या अशा वेळी सुद्धा हवा, निसर्गरम्य वातावरण आणि शांततेचा अनुभव देणारा ग्रामशेती पर्यटन म्हणजेच Agro – Tourism हा एक उत्तम पर्याय समोर आला आहे. शहरातील लोकांमध्ये आत्ता गावाकडची जीवनशैली, पारंपरिक शेती, गावठी जेवण, जुने वाडे, तेथील लोककला, याबद्दल विशेष आकर्षण निर्माण झाले आहे. गावाकडचं वातावरण हे सरळसाधं असत. त्या वातावरणामध्ये, बैलांच्या घुंगरांचा आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट, आणि गावातील लोकांच्या चेहऱ्यावर एक समाधान असत. यामध्येच शेतकऱ्यांनाही पारंपरिक शेतीबरोबरच पर्यटनाचा संयोग साधून सोबतीला उत्पन्नाचा नवा मार्ग शोधला आहे.

 

गावातील पहाटे व सायंकाळीच वातावरण, शेतीची माहिती, प्रत्यक्ष कामाचा अनुभव, शेतीतून काढलेल्या ताज्या भाजीपासून बनवलेले पारंपरिक जेवण आणि तिथल्या परंपरा, संस्कृती यांचा अनुभव शहरातील लोकांना घेता येतो. या माध्यमातून शेतकऱ्यांना केळ आर्थिक लाभ मिळत नाही तर त्यांच्या शेतीतील पद्धती, ग्रामीण भागातील संस्कृती, कला, आणि स्थानिक उत्पादनांचा प्रचारही मोठ्या प्रमाणावर होतो. यामुळे ग्रामशेती पर्यटन हे केवळ उत्पादनाचे साधन नसून गावांचा विकास, संस्कृतीचे जतन, आणि शाश्वत शेतीच्या दृष्टीने एक उत्तम पर्याय ठरत आहे.

महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध पर्यटन केंद्रे

1) पाटील फार्म

सातारा जिल्यात एका तरुणाने पारंपरिक शेती बरोबर पाटील फार्म या नावाने ग्रामशेती पर्यटन हा व्यवसाय सुरु केला. त्यांच शेत 3 एकरमध्ये आहे. या पर्यटनामध्ये बैलगाडी सफर, प्रत्यक्ष शेती, जेवणामध्ये चुलीवरची भाकरी, पिठलं, ठेचा, यानंतर लोककला, मृदा – जल माहिती, विद्यार्थ्यांसाठी कृषी अभ्यास सहल या सर्व गोष्टी उपलब्ध केल्या. तसेच त्यांनी गावातील महिला गटाकडून जेवण पुरवठा घेतला त्यामुळे गावातील लोकांना रोजगार देखील मिळाला आज या फार्म ला पुणे, मुंबई वरून पर्यटक भेट देतात.

2) साने गुरुजी कृषी पर्यटन केंद्रधुळे (. महाराष्ट्र)

ग्रामीण जीवनशैलीचा अनुभव देणारे एक सुंदर पर्यटन केंद्र म्हणून याकडं बघितलं जात. शेतात फिरणं, बैलगाडी सफर, चुलीवरच जेवण, शेतीच्या पारंपरिक पद्धती, कृषी शिक्षण शिबिरे तसेच भारूड, भजन यांसारखी सुंदर लोककला या पर्यटन केंद्राचं आकर्षण आहे.

3) गद्रे फार्म अँड कोकण टूरदेगाव, रत्नागिरी

कोकणातील पारंपरिक जीवनशैली बघणं व अनुभवन एक उत्तम पर्यटनाचा पर्याय आहे. कोकणामध्ये सोलकढी, फिश थाळी, नराळभात, घावणे, मोदक हे पदार्थ खूप प्रसिद्ध आहेत. तेथील मातीची घरे, मच्छिमारी, ऐतिहासिक स्थळांच्या सहली, जलस्रोत, समुद्र यांचा अनुभव घेण्याची उपलब्ध होते. झोपड्यांसारख्या समुद्र किनारी राहण्यासाठी होमस्टे सुविधा आहेत.

Exit mobile version