नांदणी ते कोल्हापूर ४५ किमी पदयात्रा: हजारोंची महादेवीसाठी चाल
कोल्हापूर च्या नांदणी येथील जैन मठातील महादेवी (माधुरी) हत्तींन परत आणण्यासाठी संपूर्ण कोल्हापूर जिल्हा रस्त्यावर उतरला होता . नांदणी ते कोल्हापूर अशा हजारोंच्या सख्येने लोक रस्त्यावर उतरले होते . हा प्रवास जवळजवळ 45 km चा होता . एका प्राण्यासाठी अशी घटना घडण ही खरच चांगली आणि इतिहासात प्रथम च झाली असेल . कोल्हापूरकर महादेवी हत्तींनीला परत आणण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत . कोल्हापुरातील लोक हजारोंच्या सख्येने जिओ च सिमकार्ड पोर्ट करून घेत आहेत , लाखोंच्या सख्येने सगळ्यांच्या सह्या म्हणजेच निवेदन राष्ट्रपतींना देण्यात आली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पदयात्रा .

वनतारा ची भूमिका काय ?
महादेवी हत्तीण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर वनताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विहान करणी आणि नांदणी मठाचे पूज्य सुवस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली. ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे झाली . वनताराचे अधिकारी म्हंटले की , महादेवी हत्तीबाबतचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाचा असून, तो अंतिम व बंधनकारक आहे. त्यामुळे हत्तीला स्थलांतरित करणे हा वनताराचा स्वतंत्र निर्णय नसून, न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी म्हणूनच ही कारवाई करण्यात आली आहे, असे वनताराच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मते, जर भविष्यात सर्वोच्च न्यायालयाने महादेवीला परत पाठवण्याचे आदेश दिले, तर वनतारा त्या आदेशाचे पालन नक्कीच करेल. महादेवीला नांदणी मठात नेण्यात वनताराची थेट भूमिका नव्हती; जे काही झाले ते संपूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार झाले. या बैठकीत त्यांनी सांगितले की, नांदणी मठाने जर सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्या, तर वनतारा त्यांना पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे. तसेच आवश्यकतेनुसार, वनताराची एक अधिकृत युनिट नांदणी मठात सुरू करण्याचाही विचार केला जाईल. या सर्व प्रक्रियेमध्ये महादेवीच्या आरोग्याची, सुरक्षिततेची आणि कल्याणाची पूर्णतः काळजी घेतली जाईल, हाच वनताराचा मुख्य हेतू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महादेवी बद्दलच प्रेम
हजारो ग्रामस्थांनी रविवारी पहाटेच नांदणी मठातून कोल्हापूरकडे पायी वाटचाल सुरू केली . ऊन, पावसाची तमा न बाळगता त्यांनी आपल्या लाडक्या हत्तिणी महादेवीला परत आणण्यासाठी तब्बल ४५ किलोमीटरची पदयात्रा सुरू केली. या पदयात्रेला सर्वपक्षीय आणि सर्वधर्मीय नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. विविध समाजघटक, जाती, धर्म आणि वयोगटांतील लोकांनी एकत्र येत महादेवीप्रती असलेलं आपुलकीचं नातं आणि भावनिक जोड दृढपणे प्रकट केली. ‘महादेवी‘ ही फक्त एक हत्तीण न राहता लोकांच्या श्रद्धेचं, निसर्गप्रेमाचं आणि एकोप्याचं प्रतीक बनली आहे. तिच्या पुनरागमनासाठी हा लोकशाही मार्गाने, शिस्तबद्ध आणि शांततेच्या वातावरणात करण्यात आलेला संघर्ष होता. ही पदयात्रा म्हणजे लोकांच्या आवाजातली तीव्रता आणि महादेवीला परत आणण्याची सामूहिक भावना होती.



