aadhunikshetitantra.com

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार! कोकण व घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट, विदर्भात विजांसह पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागाने (IMD) जाहीर केलेल्या ताज्या अंदाजानुसार, कोकण आणि मराठवाडा विभागातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील २४ ते ४८ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यानुसार ऑरेंज अलर्ट  दिला आहे , मागच्या आठवड्यापूर्वी पावसाने विश्रांति घेतली होती , पण आता पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे भारतीय हवामान खात्याने २५ जुलैपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये मुसळधार सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

काही भागांत पावसाची उघडीप असल्यामुळे उकाडा वाढला असून, दुसरीकडे काही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केला आहे.

कोकण आणि घाटमाथ्याच्या भागात मुसळधार पावसाचा इशारा

आज दिनांक २३ जुलै रोजी हवामान खात्याने कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.

ऑरेंज अलर्ट म्हणजे संभाव्य धोक्याची सूचना देणारा इशारा असून, संबंधित नागरिकांनी सावधगिरी बाळगावी अशी सूचना हवामान विभागाने केली आहे.

येलो अलर्ट – विजांसह पावसाची शक्यता

हवामान खात्याने खालील जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे:

·        मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक (घाटमाथा)

·        चंद्रपूर, गडचिरोली

·        नंदुरबार, धुळे, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड

·        अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया

या जिल्ह्यांमध्ये विजांसह जोरदार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. विजेच्या गडगडाटासह पावसामुळे शेतकरी, नागरिक, वाहतूकदार यांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

राज्याच्या उर्वरित भागांमध्ये हवामान विभागाने हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. जरी मोठ्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित नसेल, तरी हवामान बदलल्यामुळे अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण व सरींचा अनुभव येऊ शकतो. उद्या कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर, तसेच धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यांतही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली, तसेच मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर वाढू शकतो. इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Exit mobile version