Saturday, October 25, 2025
spot_imgspot_imgspot_img
₹0.00

No products in the cart.

Homeपशुधनजनावरांमध्ये दुग्धज्वर आजार: कारणे, लक्षणे आणि प्रभावी उपचार

जनावरांमध्ये दुग्धज्वर आजार: कारणे, लक्षणे आणि प्रभावी उपचार

दुधाळ जनावरांचे आरोग्य चांगलं ठेवण हे एक शेतकर्‍यांसाठी महत्वाची बाब आहे कारण यावरच शेतकर्‍याची आर्थिक परिस्थिती अवलंबून असते . काही वेळा जनावरांना व्यायल्यानंतर अचानक काही आजारांचा जास्त सामना करावा लागतो . याच आजारापैकी एक म्हणजे दुग्धज्वर (Milk Fever / Hypocalcemia) . हा आजार विशेषता जास्त दूध देणार्‍या गायी व म्हशींमध्ये दिसून येतो . हा आजार रक्तामध्ये कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्याने हा आजार होतो . या आजारामुळे दूध उत्पादन घटते आणि काही वेळेस जनावरांच्या जीवावरही बेतू शकत.

दुग्धज्वराची कारणे :

हा आजार विशेषता संकरीत गायी म्हणजे विदेशी जनावरांमध्ये किंवा जास्त दूध देणार्‍या गायी मध्ये दिसतो .विण्यापूर्वी किंवा व्यायल्यानंतर 48 ते 72 तासांमध्ये हा आजार जास्त उद्भवतो . रक्तातील कॅल्शियम च्या कमतरतेमुळे हा आजार जनावरांना होतो . याच मुख्य कारण म्हणजे जनावरांना आहारातून फॉस्फरस आणि मॅग्नीशियम ची कमतरता असल्यामुळे हा आजार होतो . काही वेळा विण्यापूर्वी किंवा व्यायल्यानंतर प्रवासाच्या ताणामुळे होऊ शकतो

दुग्धज्वराची लक्षणे :

  • व्यायल्यानंतर जनावरांच्या शरीरातील कॅल्शियम कमी झाल्याने स्ंनायु कमकुवत होतात व त्यामुळे जनावरांचे पाय थरथर कापतात
  • जनावरांना थंडी जाणवते व कान आणि शिंग थंड पडतात व दूध अचानक कमी होते
  • अगदी आजाराच्या सुरवातीला जनावर थोड थरथरत उभ राहत पण कॅल्शियम ची कमतरता वाढली की ते जमिनीवर च बसून राहतात कारण जनावरांच्या पायांतील स्ंनायु कमजोर होतात .
  • काही वेळेस जनावर गंभीर अवस्थेत बेशुद्ध होतात आणि मृत्युचा धोका ही असतो
  • दुग्धज्वरात जनावरांना शेण व मूत्र टाकण्यात देखील अडचणी येतात
  • जनावर अशक्त दिसत

काळजी कशी घ्याल / उपचार

  • दररोज सकाळच्या कोवळ्या उन्हात सोडणे यामुळे जनावरांच्या शरीरात सूर्यप्रकाशामुळे विटामीन-डी नैसर्गिकरीत्या तयार होते
  • जनावरांना विण्यापूर्वी किंवा व्यायल्यानंतर त्यांचं थंडी पासून संरक्षण द्यावे , त्यांना उबदार ठिकाणी बांधावे
  • विण्यापूर्वी जनावरांना एक आठवडा आधी जीवनसत्व डी चे इंजेक्शन द्यावे .
  • विण्यापूर्वी किंवा नंतर २४–३६ तासांच्या आत जनावरांना तोंडावाटे कॅल्शियमचे ३–४ डोस द्यावेत, विशेषतः दुग्धज्वराचा धोका असलेल्या गायींना
  • जनावरांना गाभण काळात योग्य तो योग्य तितकाच आहार द्यावा यामध्ये भुसा , हिरवा चारा , आणि कोरडा गवत यांचा संतुलित आहार द्यावा
  • विण्यापूर्वी किंवा व्यायल्यानंतर जनावरांना दररोज चालण्याचा व्यायाम घ्यावा यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि हांडामध्ये साठवलेले कॅल्शियम योग्य प्रकारे वापरले जाते
  • जनावरांच्या खाद्यातून मीठ व इतर पशुवैद्यकीय सल्ल्याने pre calving mineral mixture द्यावे
  • विण्यापूर्वी किंवा व्यायल्यानंतर जनावरांवर जास्त लक्ष ठेवा व विण्यापूर्वी गाभण जनावरांना स्वच्छ , शांत आणि सुरक्षित वेगळ्या जागेत बांधा
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments