aadhunikshetitantra.com

पंजाब महापूर 2025: 1300 गावं पाण्याखाली, 30 मृत्यू आणि पिकांचं अब्जावधी नुकसान

Serene wooden boat navigating on a peaceful murky water canal, traditional Thai sailboat surrounded by tropical nature and a vibrant sunset. Tranquil and picturesque boating experience.

पंजाब राज्यात झालेल्या सलग मुसळधार पावसामुळे परिस्थिति गंभीर झाली आहे . राज्यातील अनेक नद्यांना पुर आला असून सध्या 1300 हून अधिक गावांना पुरांचा वेढा आला आहे . या पुरामुळे जालंधर , फिरोजपुर , होशियारपुर या जिल्ह्यातील गावांना वेढा बसला आहे . सरकारकडून आपत्ती व्यवस्थापन पथके (NDRF आणि SDRF) गावागावांत पाठवली आहेत. जवान बोटी घेऊन, पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षित जागी नेत आहेत. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे काम थोडं अवघड होतंय, पण तरीही प्रशासन सतत प्रयत्न करत आहे.

पंजाब मधील ही स्थिति धोकादायक बनली असून त्यासोबतच जम्मू काश्मीर , उत्तराखंड , हिमाचल प्रदेश या राज्यात सुद्धा पाऊस जोरदार आहे . गेल्या 2-3 दिवसांपासून सततधार पावसामुळे पुरस्थिति निर्माण झाली आहे . नद्यांना आलेल्या महापुरांमुळे गावागावात पाणी शिरल. शेकडो रस्ते पाण्याखाली गेलेत , यामुळे गावांचा गावांचा संपर्क तुटला आहे .

आतापर्यंत 30 नागरिकांचा मृत्यू झाल्याचं समोर आल आहे , याशिवाय शेकडो लोक जखमी झाली असून शेकडो कुटुंबांना आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे लागले आहे . महापूरच्या स्थितीमुळे वीजपुरवठा , पाणी , वाहतूक बंद आहे . स्थानिक प्रशासन व स्वयंसेवी संस्था पूरग्रस्त लोकांना अन्न , पिण्याचे पाणी , औषधे तसेच कपडे पोहचवत आहेत.

पिकांचे नुकसान :

पंजाब मध्ये आलेल्या या महापुरामुळे 3.7 लाख एकर इतक शेतीच क्षेत्र पाण्याखाली गेल आहे . यामुळे शेतीच प्रचंड नुकसान झाल आहे . यामध्ये सर्वाधिक नुकसान भात (paddy) या पिकाच झाल आहे , तसेच माहितीनुसार बासमती तांदळाचे उत्पादन 20 – 25% घटण्याची शक्यता आहे . विशेषतः भात आणि बासमती उत्पादन घटल्याने देशांतर्गतच नव्हे तर निर्यात बाजारावरही परिणाम दिसेल. याशिवाय मका व इतर भाजीपाल्याच नुकसान झाले आहे . शेतीच जवळजवळ अब्जावधी पर्यंत नुकसान झाले आहे . पंजाब राज्यातील शेतीला प्रचंड आर्थिक फटका बसला आहे .

झालेल्या नुकसानी वरुन मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केंद्र सरकारकड रु 60,000 कोटींच्या निधीची मागणी केली गेली आहे , तर पूरग्रस्त शेतकर्‍याला प्रती एकर रु 50000 पर्यंत नुकसान भरपाई देण्यात यावी , अशी ही त्यांनी केंद्र सरकरकडे मागणी केली आहे . पंजाबमधील महापूराने राज्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल आहे

 

Exit mobile version