aadhunikshetitantra.com

नाचणी (Ragi): नाचणीचे आरोग्यासाठीचे महत्वाचे फायदे

Ragi or Nachni also known as finger millet and ragi flour, which is a healthy food and is gluten-free.

नाचणी (Finger millet) याला काही भागात रागी असं म्हटलं जात. महाराष्ट्रामध्ये कोकणात आणि खानदेशात हे पीक घेतलं जात. नाचणीचे दाणे आकाराने मोहरीसारखे बारीक असतात. आधीच्या काळात नाचणी हा मुख्य ग्रामीण भागातील लोकांचा आहारात असायचा. मध्यंतरी हा जास्त लोकांमध्ये लोकप्रिय नव्हता पण अलीकडच्या काळात आरोग्य जागरूकतेमुळे व त्यामध्ये असलेल्या पोषण घटकांची माहिती मिळाल्यामुळे लोकांमध्ये नाचणीची मागणी वाढली आहे. बाजारामध्ये नाचणीचे विविध उत्पादन मोठया प्रमाणावर उपलब्ध आहेत. नाचणीमध्ये फायबर, कॅल्शिअम, जीवनसत्वे, लोह, प्रथिन भरपूर प्रमाणात असतात. जे आरोग्यासाठी खूप महत्वाचे असतात. नाचणी विशेषतः वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. तर आपण याचे फायदे पाहू.

फायदे :

1) नाचणीमध्ये प्रोटीन, लोह मुबलक प्रमाणात असल्यामुळे व पचायला देखील हलकी असल्यामुळे शरीराला ताकद मिळते व अशक्तपणा कमी होतो.

2) नाचणी ग्लूटेन फ्री असल्यामुळे आणि योग्य प्रमाणात घेतल्यास गॅस, अपचन, पोटदुखी होत नाही.

3) नाचणीचे पदार्थ जस कि भाकरी, उपमा, हलवा हे सहज बनवता येतात. या पदार्थामध्ये जास्त चरबीयुक्त नाहीत आणि कॅलरीज कमी असतात त्यामुळे वजन नियंत्रणास मदत होते. यामुळे शरीरातील चरबी कमी होते.

4) नाचणीमध्ये कॅल्शिअम मुबलक प्रमाणात असल्यामुळे हाडे व दात मजबूत होतात. त्यामुळे डॉक्टर देखील लहान मुलांच्या वाढीसाठी नाचणी सत्व देण्यासाठी सांगतात.

5) यांच्यामध्ये कोलेस्ट्रॉल कमी करणारे गुणधर्म असल्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.

6) नाचणीमध्ये पॉलिफेनल आणि फायबर असते. याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरते.

7) नाचणीमुळे शरीरातील प्रतिकारकशक्ती वाढते. त्यामुळे सर्दी, खोकला, आणि इतर आजारांपासून संरक्षण मिळते.

8) नाचणीच्या सेवनामुळे त्वचा चमकदार आणि निरोगी राहते.

नाचणी खाण्याची स्वरूपे

नाचणीपासून भाकरी, घावणे, नाचणी मोडापासून डोसा, इडली, उपमा, थालीपीठ, नाचणीचे लाडू, सूप असे भरपूर पदार्थ बनवता येतात. तसेच “रागी मुद्दे” हा एक आजच्या काळात लोकप्रिय पदार्थ मानला जातो. पण कर्नाटकमध्ये तो स्टेपल फूड म्हणून ओळखला जातो. डायटिशियन, न्यूट्रिशनिस्ट रागी मुद्दे खाण्याचा सल्ला देतात कारण हा पदार्थ पचायला हलका व पौष्टिक आहे. फायबर भरपूर असल्यामुळे पोट दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते आणि वारंवार भूक लागत नाही. त्यामुळेच नाचणीला खऱ्या अर्थाने आरोग्यदायी सुपरफूड म्हणता येईल.

Exit mobile version