रेशन कार्ड अपडेट : महाराष्ट्रात रेशन कार्ड योजनेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. सरकारकडून सध्या मिशन सुधार अभियान राबवले जात आहे , या मोहिमेत रेशन कार्डधारकांची सखोल तपासणी केली जाणार आहे.या तपासणीत राज्यभरात मोठ्या प्रमाणावर संशयास्पद नोंदी समोर आल्या आहेत. त्यामुळे अनेक रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने आधार क्रमांक आणि सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) मधील माहितीची पडताळणी करून ही कारवाई हाती घेतली आहे.
आधारमधील त्रुटी, चुकीची नोंद, एकाच व्यक्तीचे नाव वेगवेगळ्या ठिकाणी असणे, तसेच मृत व्यक्तींची नावे, पात्र नसतानाही लाभ घेणारे लोक यांना रेशन योजनेतून वगळले जाणार आहेत. अशा विविध कारणांमुळे ही नावे संशयास्पद ठरली आहेत. या तपासणीत राज्यात एकूण 88 लाख 58 हजार 540 लाभार्थी संशयाच्या यादीत आढळून आले आहेत.
रेशन कार्ड तपासणी मोहीम
- केंद्र सरकारकडून आधार क्रमांक आणि PDS (रेशन) डेटाच्या आधारे संशयास्पद लाभार्थ्यांची यादी तयार केली जात आहे.
- ही यादी जिल्हानिहाय बनवली असून सध्या सर्व ठिकाणी पडताळणी सुरू आहे.
- पुरवठा विभागाचे निरीक्षक घरोघरी जाऊन तपासणी करत आहेत.
- संबंधित व्यक्ती जिवंत आहे का, त्या पत्त्यावर राहते का आणि आधारची माहिती बरोबर आहे का, याची खात्री केली जात आहे.
- नाव चुकीचे, बनावट किंवा अपात्र आढळल्यास निरीक्षक ते नाव वगळण्याची शिफारस तहसीलदारांकडे करतात.
- मात्र रेशन कार्डवरून नाव काढायचा अंतिम निर्णय तहसीलदारच घेतात.
- केंद्र सरकारने राज्यातील शिधापत्रिका प्रणाली स्वच्छ आणि पारदर्शक करण्यासाठी मिशन सुधार अभियान सुरू केले आहे.
- या मोहिमेत मृत व्यक्तींची नावे, दुबार नोंद आणि आधारमधील चुका शोधल्या जात आहेत.
- आतापर्यंत राज्यात सुमारे 88 लाखांहून अधिक लाभार्थी संशयास्पद असल्याचे समोर आले आहे.
- काही जिल्ह्यांत परराज्यातील किंवा परदेशी नागरिकांनी रेशनचा गैरवापर केल्याचा संशय आहे.
- त्यामुळे आधार क्रमांकात त्रुटी असलेल्या लोकांची थेट तपासणी केली जात आहे..
100 वर्षांहून अधिक वय असलेल्या लाभार्थ्यांची विशेष तपासणी
- 100 वर्षांपेक्षा जास्त वय दाखवलेल्या लाभार्थ्यांची वेगळी चौकशी केली जात आहे.
- अनेक ठिकाणी अशा नावांवर अजूनही रेशन घेतले जात असल्याने ती व्यक्ती जिवंत आहे की नाही, याची खात्री केली जाते.
पुणे जिल्ह्याची स्थिती
- पुणे जिल्ह्यात सुमारे 1 लाख 35 हजारांहून अधिक लाभार्थी संशयास्पद आढळले आहेत.
- अनेकांची नावे दोन किंवा त्याहून अधिक ठिकाणी नोंदलेली आहेत.
- यात राज्यातील तसेच राज्याबाहेरील लाभार्थ्यांचाही समावेश आहे.
ही संपूर्ण मोहीम रेशनचा लाभ फक्त योग्य आणि गरजू लोकांनाच मिळावा यासाठी आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर जे अपात्र आहेत त्यांची नावे काढली जातील आणि त्यामुळे रेशन व्यवस्था अधिक नीट व विश्वासार्ह होईल.
हे ही वाचा : GI Food : भौगोलिक निर्देशांक, आजरा घनसाळ तांदळाचे वैशिष्ट्य
Balwaan Krishi Battery and Manual 2 in 1 Knapsack Sprayer (18 लिटर, High Pressure) आजच खरेदी करा आणि फवारणी करा अधिक सोपी व प्रभावी!
