aadhunikshetitantra.com

रब्बी पीक विमा योजना 2025–26: अंतिम तारिख व ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

रब्बी पीक विमा योजना 2025-26

रब्बी पीक विमा योजना 2025-26 भरण्यासाठी चालू आहे. ज्या शेतकऱ्यांना पीक विमा भरायचा आहे, त्यांनी प्रथम E-पीक पाहणी करून त्यानंतर पीक विमा भरून घ्यायचा आहे. रब्बी पीक विमा योजनेची शेवटची तारीख काही पिकांसाठी 15 डिसेंबर होती; मात्र गहू, हरभरा (चणा) आणि बागायती पिके घेणाऱ्या अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत, अर्ज करण्याची संधी अजूनही वाढवली गेली आहे.

शेतकऱ्यांनी शेवटच्या दिवसांची वाट न पाहता वेळेत अर्ज भरावा, कारण अंतिम टप्प्यात वेबसाईटवर तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता असू शकते. जिल्ह्यानुसार अंतिम तारखेमध्ये 2 ते 3 दिवसाचा फरक असू शकतो.

मागील काही हंगामामध्ये महाराष्ट्र सरकारकडून रब्बी पीक विमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांसाठी केवळ Rs.1 मध्ये पीक विमा हि सवलत देण्यात अली होती. मात्र 2025-26 हंगामासाठी हि सवलत लागू राहणार नाही.

विमा हप्त्याचे दर :

ऑनलाइन अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत (PMFBY) CSC केंद्र किंवा ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करताना खालील कागदपत्रे अनिवार्य आहेत:

  1. ७/१२ उतारा (सातबारा)
    – नवीनतम व अद्ययावत असणे आवश्यक (डिजिटल स्वाक्षरी असल्यास अधिक योग्य)
  2. ८-अ उतारा
    – शेतकऱ्याच्या एकूण जमीनधारणेची माहिती दर्शविण्यासाठी
  3. बँक पासबुक
    – आधारशी लिंक असलेले व DBT (Direct Benefit Transfer) सक्षम खाते
  4. आधार कार्ड
    – ओळख व ई-केवायसी पडताळणीसाठी आवश्यक
  5. पीक पेरा स्व-घोषणा पत्र
    – संबंधित हंगामात कोणते पीक घेतले आहे याची माहिती देण्यासाठी

पीक विम्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

   PMFBY च्या अधिकृत पोर्टलला भेट द्या.

शेवटची तारीख जवळ आली आहे, त्यामुळे लवकर अर्ज करून विमा भरून ठेवा. ही योजना पिकांना इतर नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानापासून सुरक्षित ठेवते. घरबसल्या ऑनलाइन अर्ज करा आणि पावती जतन करायला विसरू नका.

हे ही वाचा : पीकविमा योजनेतील बदलांचा फटका; पीकविम्याची भरपाई अद्याप नाही

Exit mobile version