बीड जिल्हा हा शेतीसाठी पावसावर अवलंबून असतो. अस म्हटलं जातयं की, 100 वर्षांनी इतका बीड जिल्ह्यामध्ये पाऊस झालाय. मागील काही दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदी-नाले, ओसडून वाहत आहेत. अनेक गावामध्ये पुराच पाणी शिरल आहे. यामुळे नागरिकांच जनजीवन विस्कळीत झाल आहे.

पावसामुळे झालेल नुकसान –
मराठवाड्यातील धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून 64 मिमि पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये कितीतरी हेक्टर पाण्याखाली गेले आहे. जनावरांचे मृत्यू झाले. शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे सोयाबीन, बाजरी, कापूस आणि डाळींच्या पिकांचे नुकसान झाले आहे.
याचदरम्यान दोन दुर्दैवी अपघातांमध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच धामणगाव येथील 30 वर्षीय अफ्रोज बगवान यांचा ओसंडून वाहणाऱ्या नाल्यात बुडून मृत्यू झाला स्थानिक नागरिकांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे, तर घाटपिपंळ गाव येथील 69 वर्षीय श्रावण शिंदे यांचा बचाव कार्यादरम्यान मृत्यू झाला.
तसेच आंबेजोगाई येथील चिंचखडी येथे पेरकोलेशन टाकी फुटल्यामुळे आजुबाजुची गावे पाण्याखाली गेली आहेत.
महसूल विभागाने स्थानिक प्रशासनाला पिकाचे नुकसान व या भागामध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे घरातील वस्तू वाहून गेलेल्या आहेत.
बीड जिल्ह्य़ातील शाळांना सुट्ट्या जाहिर करण्यात आल्या आहेत. . विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बीड शहरासह ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील पाटोदा, आष्टी, शिरूर या भागामध्ये जोरदार पाऊस कोसळला. पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला असून खबरदारी म्हणून बीड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे
. बीड जिल्ह्यात जोरदार पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले आहे दोन जणांचा मृत्यू झाला आहे, शेतकऱ्यांची पिकं खराब झाली आहेत आणि लोकांना खूप त्रास होत आहे सर्व सामान्य लोकांनाही यामुळे खूप त्रास होत आहे. प्रशासन आपले काम करत आहे, पण लोकांनीही काळजी घेणे खूप गरजेचे आहे



