रेशीम शेती (Sericulture): कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणारा व्यवसाय
शेती संलग्न व्यवसायासाठी एक फायदेशीर व्यवसाय म्हणजेच रेशीम शेती. जगामध्ये सर्वात मोठ्या रेशीम उत्पादनासाठी भारत देश ओळखला जातो. भारतामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रेशीम शेती केली जाते. रेशीम शेती चं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कमी जागेत, कमी भांडवलात आणि अल्पकाळामध्ये नफा देणारा व्यवसाय. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी हा रोजगार व उत्पन्नाचा उत्तम पर्याय ठरतो.
रेशीम शेती म्हणजे काय ?
रेशीमशेती म्हणजे कोषपालन करून रेशीम (सिल्क) तयार करण्याची प्रक्रिया. यामध्ये विशिष्ट प्रकारच्या अळ्या (रेशीम अळी) पाळल्या जातात, ज्या मलबेरी झाडांच्या पानांवर पोसल्या जातात. या अळ्यांपासून जेव्हा कोष तयार करतात, तेव्हा त्यातून मिळणाऱ्या धाग्यांपासून नैसर्गिक रेशीम तयार होते.
तुती रेशीम प्रक्रिया –
1) तुती लागवड –
तुतींचे अनेक सुधारित वाण बाजारात उपलब्ध आहेत. ज्या वाणांची पाने मोठी, लांब, व लुसलुशीत हिरव्या पानांची निवड करावी. तुती लागवडीनंतर अडीच ते तीन महिन्यांनी तुतीचा पाला रेशीम अळ्यांना खाण्यासाठी तयार होतो.
2) अळीचे संगोपन –
रेशीम अळीसाठी रंगविरहित वातावरण, स्वच्छ जागा आणि तापमान 27-28° से. पर्यंत असावे. व आद्रता 80-90% असणे आवश्यक आहे.
या अवस्थेत संगोपन करताना खूप काळजी घ्यावी लागते. या अवस्थेत रोग लागण झाल्यास संपूर्ण बॅच बाद होण्याची शक्यता असते.
25 ते 30 दिवसांमध्ये या अळ्या पूर्णपणे वाढतात. प्रौढ अवस्थेतील अळ्या मोठ्या प्रमाणात खाद्य खातात.
जिथे रेशीम अळीसाठी खोली केली आहे ती जागा हवेशीर ठिकाणी असावी, हवा खेळती राहण्यासाठी खालच्या व वरच्या बाजूस भिंतींना खिडक्या ठेवण्यात याव्या.
अळ्यांना तुतीची चांगली वाढ झालेल्या फांद्या द्यावा. फांद्यांची तोडणी सकाळी व संध्याकाळी करावी.
3) अळीच्या रॅकमधील हवा खेळती व कोरडी राहावी याची काळजी घ्यावी. नंतरच्या टप्प्यात जास्त तापमान आणि जास्त आद्रता राहणार नाही याची काळजी घ्यावी.
4) परिपक्व अळ्या –
सर्वात शेवटच्या अवस्थेतील अळी 7-8 दिवसात परिपक्व होते. त्यावेळी तुतीची पण देणे थांबवावं. कोष तयार करण्याचा कालावधी साधारण 3-5 दिवसांचा असतो. हा टप्पा अत्यंत संवेदनशील असतो, कारण अळ्यांना शांतता आणि योग्य वातावरण आवश्यक असते.
परिपक्व झालेली कीटक त्वरित वेचावे
