महाराष्ट्रामध्ये पुढील काही दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्यान दिला आहे. पुढील 2 ते 3 दिवसामध्ये पावसाची तीव्रता जास्त वाढण्याची शक्यता आहे. तर मुंबई, पुणे, सातारा, घाटमाथा, रायगड, रत्नागिरी या जिल्हांना Orange आणि Yellow अलर्ट जारी करण्यात आला आहे तर काही भागांमध्ये ढगफुटी, वीजा, आणि मुसळधार पावसाचा धोका आहे.
मान्सून परतीचा प्रवास
राजस्थानमधून मान्सून परतीचा प्रवास सुरु झाला आहे. उत्तर-पश्चिमेकडून सुरू होतो . सर्वप्रथम पश्चिम राजस्थानमधून मान्सून मागे फिरतो , कारण हा भाग कोरडा, वाळवंटी आणि कमी आर्द्रतेचा आहे. नंतर हा प्रवास पुढे पूर्व राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्राच्या उत्तर भागातून पुढे सरकत जातो. साधारण ऑक्टोबरच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यापर्यंत तो दक्षिण भारतातून पूर्णपणे बाहेर पडतो. परतीचा प्रवास हा थंड व कोरड्या वायुप्रवाहाच्या प्रभावामुळे होतो. जेव्हा पश्चिमेकडून येणारे कोरडे वारे वरचढ होऊ लागतात आणि वातावरणातील ओलावा कमी होतो, तेव्हा पावसाळी ढगांचा पुरवठा थांबतो. राजस्थानातील वाळवंटी परिस्थितीमुळे इथून परतीचा प्रवास लवकर दिसून येते.
मराठवाड्यासह विदर्भातही पावसाचा जोर वाढला आहे. तर अहिल्यानगर मधील पाथर्डी तालुक्यात ढगफुटी सारखा पाऊस झाला आहे. यामुळे वाहतुक विस्कळीत झाली, यामध्ये शेतीच नुकसान झालय. जनावरे वाहून गेलेत, घर पाण्याखाली गेलेत.
* बीडमधील ढगफुटी –
बीडमधील अष्टी तालुक्यात झालेल्या ढगफुटीमुळे अनेक गावाचा संपर्क तुटलाय. पावसामुळे शेतीच प्रचंड नुकसान झालय. प्रशासनाकडून पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी सैन्य दलाची मदत घेतली जात आहे.
सोमवारी अष्टी मधील गावामध्ये ढगफुटी सारखा पाऊस झाला. या पावसामुळे नदीला पूर आला तर आजुबाजुच्या घरामध्ये पाणी शिरलं. यामधेच गावातील नागरिक पुराच्या पाण्यामध्ये अडकले. सैन्य दलानं पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढलं. घाट पिंपरी, कडा, पिंपरखेड, निमगाव, चोभा या भागामध्ये 96 मिमी पावसाची नोंद झाली. बीडमध्ये झालेल्या पावसामुळे बिडझरा प्राणी प्रकल्प ओसडून वाहू लागला यामुळे गावागावात पाणी शिरलं, तसेच काही ठिकाणी वाहने देखील वाहून गेली, वीजपुरवठा खंडित झाला. बीड बरोबरच पूर्ण मराठवाड्यात ही पावसाचा तडाखा होता. यामुळे गोदावरी व तिच्या उपनद्यांना पुर आला. महसूल विभागाने स्थानिक प्रशासनाला आदेश दिले आहेत की त्यांनी गावागाव जाऊन पिकांचे नुकसान पाहावे आणि पंचनामे तयार करावे. या अहवालाच्या आधारे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल,
