aadhunikshetitantra.com

“मोत्याची शेती: कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणारा शेती व्यवसाय”

 

आजच्या बदलत्या काळात  बरेच शेतकरी किंवा मोठ मोठ्या पदवी घेतलेले युवक आज नोकरीच्या मागे न लागता आज शेती सलग्न व्यवसायात चांगलं काम करत आहेत , त्यामध्ये असाच एक व्यवसाय म्हणजे मोत्याची शेती ज्याला इंग्रजीत pearl farming असे म्हणतात..  पारंपरिक शेतीबरोबरच पूरक व्यवसायांकडे अनेक शेतकरी वळत आहेत ही शेती भारतात अजूनही नव्या स्वरूपात आहे, पण योग्य प्रशिक्षण आणि व्यवस्थापनामुळे ही एक कमीत कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणारी शेती ठरते.

मोत्याची शेती (Pearl Farming) ही कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळवणारा एक वेगवेगळा आणि आकर्षक शेती व्यवसाय म्हणून ओळखली जाते. मोत्याची मागणी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात वर्षानुवर्षे स्थिर राहिली आहे, त्यामुळे यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी चांगली आर्थिक संधी आहे. खाली मोत्याची शेतीबाबत संपूर्ण माहिती दिली आहे.

मोत्याची शेती म्हणजे शिंपल्यांच्या (Oysters) मधून कृत्रिम मोती तयार केला जातो . समुद्रातील किंवा गोड्या पाण्यातील विशिष्ट प्रकारच्या शिंपल्यांमध्ये एक छोटा पदार्थ (core) घालून त्याभोवती नैसर्गिकरित्या मोती तयार होतो. यालाच “कल्चर्ड पर्ल” म्हणतात. ही संपूर्ण प्रक्रिया नियंत्रित पाण्यात केली जाते, म्हणून याला मोत्याची शेती ( pearl farming) मानले जाते.

मोत्याची शेतीसाठी लागणाऱ्या 4 मुख्य गोष्टी

  1. गुणवत्तापूर्ण पाण्याचा स्त्रोत
  1. आरोग्यदायक शिंपले (Oysters)
  1. सर्जरी व मोती घालण्याची प्रक्रिया
  1. नियमित देखभाल व अन्नपुरवठा

 

मोत्याची शेती कशी केली जाते?

 

मोत्याची शेती ही एक शास्त्रीय, कौशल्याधारित व संयमपूर्वक केली जाणारी प्रक्रिया आहे यामध्ये अचूकता, प्रशिक्षण आणि देखभाल खूप आवश्यक आहे . गोड्या पाण्याचे स्थिर स्रोत – जसे की नैसर्गिक तळं, सिमेंटची कृत्रिम टाकी किंवा शेततळं याचा उपयोग केला जातो. पाण्याचा pH सुमारे 7 ते 8 दरम्यान असावा लागतो आणि तापमान 25°C ते 32°C दरम्यान ठेवले गेले पाहिजे. यानंतर शिंपले निवडण्याची प्रक्रिया केली जाते. सर्जरी हा मोत्याच्या शेतीतील अत्यंत नाजूक टप्पा आहे. यात प्रशिक्षित व्यक्ती शिंपल्याच्या आत मणी घालते. ही प्रक्रिया निर्जंतुकीत वातावरणात केली जाते. सर्जरीनंतर शिंपले काही दिवस विश्रांतीसाठी ठेवली जातात , सर्जरीनंतर शिंपले जाळ्यांत किंवा टाकीत 8–12 महिने ठेवली जातात. या काळात त्यांच्या आत मोती तयार होतो. दर 15–20 दिवसांनी शिंपल्यांची सफाई, पाण्याची तपासणी आणि अन्नपुरवठा करावा लागतो.

 

“मोत्याच्या शेतीतील गुंतवणूक आणि नफा”

मोत्याची शेती सुरू करण्यासाठी फार मोठी गुंतवणूक आवश्यक नाही. जर एखाद्याने 1000 शिंपले घेऊन लघु स्तरावर सुरुवात केली, तर अंदाजे ₹75,000 ते ₹1,10,000 इतका खर्च येतो. या खर्चामध्ये सिमेंटची टाकी किंवा तळ्याची उभारणी, शिंपल्यांची खरेदी, सर्जरीसाठी कुशल कामगार, देखभाल साहित्य, अन्नपुरवठा, तसेच प्रशिक्षण आणि परवानगीचे शुल्क यांचा समावेश होतो. योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केल्यास ही शेती कमी खर्चात सुरू होऊ शकते.

मोत्याची गुणवत्ता आणि व्यवस्थापन चांगले असेल, तर 1000 शिंपल्यांमधून 700–800 मोती तयार होतात. प्रत्येकी ₹150–₹400 दर मिळतो. त्यामुळे 8–12 महिन्यांत ₹30,000 ते ₹1,50,000 पर्यंत निव्वळ नफा मिळू शकतो. उत्कृष्ट दर्जाचे मोती ₹1000 पेक्षा जास्त दरानेही विकले जातात.

.

Exit mobile version