aadhunikshetitantra.com

‘GI टॅग’ कोल्हापुरी चप्पल vs प्राडा: ८०० वर्षांचा वारसा चर्चेत!

Groom in red velvet trousers puts on golden wedding shoes

सध्या सोशल मीडियावर आणि फॅशनच्या जगात एकाच गोष्टीची जोरदार चर्चा सुरू आहे — ती म्हणजे ‘प्राडा’ या प्रसिद्ध इटालियन ब्रँडने इटलीच्या मिलान शहरात आयोजित केलेल्या  “मिलान फॅशन वीक” मध्ये सादर केलेली एक चप्पल, जी पाहताना अगदी आपल्या पारंपरिक कोल्हापुरी चप्पलसारखी वाटते आणि तिची किंमत तब्बल १ लाख रुपये!

हे चप्पल पाहताच अनेक भारतीयांनी यावर नाराजी व्यक्त केली. कारण चप्पल दिसायला जशी कोल्हापुरी, तशीच. पण कुठेही “India”, “Kolhapuri”, किंवा “Indian craftsmanship” असा उल्लेख नव्हता.

कोल्हापुरी चप्पल – पावलांमधून वाजणारा ८०० वर्षांचा इतिहास

“कर्रर्र… कर्रर्र…” असा आवाज करत चालणारी एक चप्पल – जी ओळखता क्षणात पटते – ती म्हणजे आपली कोल्हापुरी चप्पल. पण ही केवळ एक चप्पल नव्हे, ती म्हणजे कोल्हापूरच्या मातीतून जन्मलेला जिवंत वारसा आहे.
शुद्ध चामड्याची, हाताने शिवलेली, टिकाऊ आणि मजबूत अशी ही चप्पल आजही जगभरात ओळखली जाते. इतिहास सांगतो की कोल्हापुरी चप्पल शिवकालात, आणि त्याही आधी यादव काळात वापरली जात होती. इतकंच नव्हे, तर छत्रपती शाहू महाराजांपासून ते ग्रामीण लोकांपर्यंत – प्रत्येकाच्या पावलांवर ही चप्पल कधी ना कधी सजली आहे.

आज कोल्हापुरी चपलेचेही अनेक प्रकार आहेत.

२०१९ साली, कोल्हापुरी चप्पलला मिळालं GI टॅग – म्हणजेच भौगोलिक मानांकन.

हे टॅग मिळाल्यानं चप्पल बनवणाऱ्या स्थानिक कारागिरांचं हक्काचं उत्पादन म्हणून मान्यता मिळाली.

१ लाखाची चप्पल की ८०० वर्षांचा वारसा

कोल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील कारागीर ही चप्पल हाताने शुद्ध चामड्यापासून तयार करतात आणि तिची किंमत स्थानिक बाजारात साधारणतः ८०० ते १,००० रुपयांच्या दरम्यान असते. पण जेव्हा ‘प्राडा’सारखा आंतरराष्ट्रीय ब्रँड हाच डिझाइन घेतो आणि तो मिलान फॅशन वीकमध्ये सादर करतो, तेव्हा तिची किंमत थेट १ लाख रुपयांपर्यंत जाते! ही केवळ किंमतीतील तफावत नाही, तर एक मोठा विरोधाभास आहे — कारण ज्यांच्या हातात ही कला जन्माला आली, त्यांना ना श्रेय, ना नावलौकिक, ना नफा. कोल्हापुरी चप्पलचा ८०० वर्षांचा वारसा, ‘GI टॅग’सारखं बौद्धिक मालमत्तेचं संरक्षण, आणि कारागिरांचं कौशल्य – हे सगळं झाकून फक्त स्टाईल म्हणून ती चप्पल जगाला दाखवली गेली. म्हणूनच अनेकांनी हा मुद्दा केवळ डिझाइन चोरी म्हणून नाही, तर सांस्कृतिक शोषण आणि हक्काच्या अपमानाच्या रूपात पाहिला.

कोल्हापुरी चप्पल – प्राडा वादामुळे चर्चेत! ८०० वर्षांचा इतिहास आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड ‘प्राडा’शी झालेला वाद याबद्दल सविस्तर माहिती मिळवा. कोल्हापुरी चप्पल – प्राडाape to. You have to stay true to your heritage, that’s what your brand is about.

 

Exit mobile version