कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे, नदीकाठी राहणाऱ्या लोकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केलेले आहे. वाढत्या पावसामुळे अट्टमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला असून या निर्णयामागे पूरस्थिती टाळण्याचा उद्देश आहे.
कोल्हापूर जिल्यातील गगनबावडा, पन्हाळा तालुक्यातील व इतर तालुक्यातील जवळजवळ 50 बंधारे पाण्याखाली असल्याने वाहतूक बंद आहे.
गगनबावडा येथे कुंभी नदीच्या पुराचं पाणी मुख्य रस्त्यावर आल्यानं कोल्हापूर ते कोकण ला जाणारा मार्ग बंद आहे. तसेच याचा फटका शेतकऱ्यांनाही बसला आहे. कारण गेल्या दोन तीन दिवसांपासून वाहतूक बंद असल्यामुळे हजारो लिटर दूध हे घरातच राहिले आणि ज्यांचे शेत नदीकाठी आहे त्यांची पिके पाण्याखाली जाऊन ती खराब होण्याची भीती शेतकऱ्यांच्या मनात आहे त्यामुळे शेतकरी काळजीत आहेत.
कृष्णा – वारणा – पंचगंगा –
कृष्णा, वारणा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीवर मोठी वाढ झालेली आहे. पंचगंगा नदी हि धोका पातळी ओलांडण्याची शक्यता आहे, त्यामुळे लोकांमध्ये भीतीच वातावरण आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील मुख्य रस्ते बंद झाले आहेत. तसेच काही गावांमध्ये पाणी शिरलं आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनानं काही शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
शेतीचं नुकसान –
राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. कृषिमंत्र्यांनी दिलेली आकडेवारी धक्कादायक आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण प्राथमिक अंदाजानुसार 20 लाख 12 हजार एकराचं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांनी एवढ्या कष्टाने कसलेली शेती मातीमोल झाली. पश्चिम महाराष्ट्र नव्हे तर मराठवाड्यातील काही भागांत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोयाबीन सारखी पिके पाण्यात जास्त काळ राहिल्यास मुळे कुजतात.
पूर स्थितीमुळे सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसतो. नदीकाठी असलेल्या पिकांमध्ये जास्तीत जास्त ऊस आणि भात हि पिके असतात. हि पिके पाण्याखाली जाऊन पूर्णपणे कुजतात आणि उरलेल्या पिकांमध्ये पुरामुळे कीड आणि रोग लागून उत्पादनात मोठी घाट होते.
काही भागांमध्ये गोठ्यामध्ये पाणी शिरून जनावरांची जीवित हानी होते, जनावरांना स्थलांतरित करावं लागत, जनावरांसाठी चार उपलब्ध होत नाही.
महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 19 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे. शेतकऱ्यांचे एकराच्या एकर शेत पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे शेतकरी राज्य सरकारकडून लवकरात लवकर मदतीची अपेक्षा करत आहे.
